सामान्य माणसांचे प्रश्न सोडवणे हाच अजेंडा - पोलिस अधिक्षक राजेंद्र माने

सुशांत सांगवे
गुरुवार, 2 ऑगस्ट 2018

लातूर : ‘‘सामान्यातील सामान्य माणसांना सहजपणे पोलिस ठाण्यात येता आले पाहिजे. त्यांना तितक्याच सहजपणे आपले प्रश्न इथे मांडता आले पाहिजेत. त्यांच्या समस्या सोडवणे हाच माझ्या कामाचा प्रमुख अजेंडा आहे. तो लातूरमध्येही मी कायम जपेन’’, असा विश्वास पोलिस अधिक्षक राजेंद्र माने यांनी गुरूवारी व्यक्त केला.

लातूर येथील पोलिस अधिक्षक डॉ. शिवाजी राठोड यांची ठाण्यात तर नवी मुंबईतील पोलिस उपायुक्त राजेंद्र माने यांची लातूर येथे पोलिस अधिक्षक म्हणून बदली झाली आहे. माने यांनी गुरूवारी पदभार स्वीकारला. या वेळी डॉ. राठोड यांनी त्यांचे स्वागत केले.

माने म्हणाले, ‘‘लातूर माझ्यासाठी नवे नाही. लातूरच्या शेजारी असलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यात अपर पोलिस अधिक्षक म्हणून मी तीन वर्ष होतो. प्रगतीपथावर असलेल्या या जिल्ह्यात विद्यार्थी संख्या मोठ्या प्रमाणात आहे. शहरीकरण वेगाने होत आहे. याचे फायदे असतात. तसे वेगवेगळे प्रश्नही आहेत. हे प्रश्न कसे सोडवता येतील, यावर आमचा भर राहील. कुठल्याही माणसाला सहजपणे आपला प्रश्न पोलिसांसमोर मांडता आला पाहीजे, असे वातावरण तयार केले जाईल.’’

‘‘लातूरात दुचाकीचोरीच्या घटना वाढत आहेत. केवळ लातूरातच नव्हे अनेक शहरात या घटना घडताना दिसत आहेत. पण हा प्रश्न कसा सोडवता येईल, याकडे आम्ही गांभीर्याने पाहू.’’
- राजेंद्र माने, पोलिस अधिक्षक

Web Title: solve common mans problem is our agenda said sp rajendra mane