
लातूर शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करून सामान्य नागरिकांना दिलासा द्यावा, असे आदेश जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी पोलिस व महापालिकेला दिले आहेत.
लातूर : शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करून सामान्य नागरिकांना दिलासा द्यावा, असे आदेश जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी पोलिस व महापालिकेला दिले आहेत. येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित रस्ते सुरक्षा समिती आढावा बैठकीत ते बोलत होते. याबैठकीस पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, महानगरपालिका आयुक्त देविदास टेकाळे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील, कार्यकारी अभियंता बाबासाहेब थोरात, नगरपालिका प्रशासन अधिकारी सतीश शिवणे, जिल्हा नियोजन अधिकारी श्री. दुशिंग उपस्थित होते.
एमआयएमने काढली औरंगाबादेत रॅली, बिहार विधानसभा निवडणुकीत पक्षाला यश
जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेचा कोणत्या न कोणत्या कामामुळे शहराकडे येण्याचा ओघ वाढतच आहे. त्यांना दळणवळणासाठी पायाभूत सुविधा देण्यासाठी संबंधितांनी वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवून पार्किंग व्यवस्थेचे नियोजन करावे तसेच पार्किंग झोनचे फलक लावणे आवश्यक आहे, अशा स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या.
शहरातील स्वच्छता तसेच गुन्हेगारी यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. त्यातील काही ठिकाणी कॅमेरे बंद आहेत. ते ताबडतोब दुरुस्त करून नवीन ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे प्रस्ताव संबंधित विभागाने तत्काळ दाखल करावेत, अशा सूचना जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी दिल्या.
भाजपचे जयसिंगराव गायकवाड यांचा पदवीधरसाठी अर्ज दाखल, बोराळकरांसमोर आवाहन?
यावेळी जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी शहरातील वाहतूक, सोलार सिस्टिम, रिंगरोडवरील स्ट्रीट लाइट चालू करणे, नवीन पार्किंग झोन, मल्टी स्टोरेज पार्किंग झोनबाबत प्रस्ताव दाखल करणे, शहरातील मोकाट जनावरांमुळे नागरिकास व रहदारीस अडथळा निर्माण होणार नाही, यासाठी मोकाट जनावरांचा बंदोबस्त करणे नवीन सीटी बसस्टॉप थांबे तसेच जुने जिल्हाधिकारी कार्यालये परिसरातील वाहन पार्किंग व्यवस्थेचे तत्काळ नियोजन करावेत अशा सूचना पोलिस विभाग, महापालिका सार्वजनिक बांधकाम विभागास त्यांनी दिल्या. या बैठकीस रस्ते सुरक्षा समितीचे सदस्य, पोलिस, परिवहन, महानगर पालिकेतील अधिकारी उपस्थित होते.