वीज तारेच्या स्पर्शाने बापलेकाचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 जुलै 2018

चित्तेपिंपळगाव (ता.औरंगाबाद) येथे घरावरील विद्युत तारेला बद्रि खंडागळे (वय २७) यांच्या  हाताचा स्पर्श झाल्याने ते ताराला चिटकले. त्यांना वाचविण्यासाठी त्यांचे वडील शिवाजी खंडागळे (वय ५५) गेले असता तेही चिटकले. त्यात दोघांचाही मृत्यू झाला.

चित्तेपिपंळगाव : चित्तेपिंपळगाव (ता.औरंगाबाद) येथे घरावरील विद्युत तारेला बद्रि खंडागळे (वय २७) यांच्या  हाताचा स्पर्श झाल्याने ते ताराला चिटकले. त्यांना वाचविण्यासाठी त्यांचे वडील शिवाजी खंडागळे (वय ५५) गेले असता तेही चिटकले. त्यात दोघांचाही मृत्यू झाला.

ही घटना बद्री यांची पत्नी रेणुका खंडागळे यांनी पाहिली असता त्यांनी लाईनमनला फोनवरून संपर्क साधून विजपुरवठा खंडित करण्यास सांगितले. खंडागळे बापलेकाला औरंगाबाद येथील शासकीय घाटी रुग्णालयात उपचारासाठी नेले असता डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.

Web Title: son and father death due to touch of the electricity line