पोटच्या मुलाने काढले माता-पित्याला बाहेर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 डिसेंबर 2018

औरंगाबाद - दारोदार मायबाप, कुणाचे पाप? ही उक्ती सर्वश्रुत आहे. ज्या आईने नऊ महिने पोटात आणि सज्ञान होईपर्यंत सांभाळ केला, वडिलांनी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपले त्याच दिवट्या मुलाने दोघांना बाहेरचा रस्ता दाखवावा, ही शोकांतिकाच म्हणावी लागेल. असाच काहीसा प्रकार सिडको-हडको एन-बारा भागात घडला. यात मुलासह सुनेवर पाच डिसेंबरला सिडको पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली.

सिडको पोलिसांनी माहिती दिली की, इकबाल शेख हे सिद्धार्थनगर येथे राहतात. मजुरीकाम करून त्यांनी तीन मुलांचा सांभाळ केला. याच भागात प्लॉट घेऊन कसेबसे पत्र्याचे का होईना घर बांधले. पुढे मुलांचे विवाहही झाले. इकबाल शेख व त्यांची पत्नी वयोमानाने थकले आहेत. दोन मुले काळजी घेतात, विचारत असताना त्यांचा अस्लम मोहंमद हा मुलगा इकबाल शेख यांना हिस्सा मागत आहे. यातून त्याने जन्मदात्यांनाच घराबाहेरचा रस्ता दाखविला. घर खाली करा, येथून निघून जा... वृद्धाश्रमात जा अन्यथा घर नावावर करा, अशी मागणी तो करीत आहे. याला त्याच्या पत्नीचीही साथ असल्याने इकबाल शेख हवालदिल झाले. घरापोटी एक लाख रुपये देऊ केल्यानंतरही घरच हवे, असा अट्टहास मुलाचा असून त्याच्याकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून त्यांना तक्रार द्यावी लागली. त्यानुसार, सिडको पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली. तपास पोलिस नाईक विजय वाघ करीत आहेत.

Web Title: Son Father Mother Home Crime

टॅग्स