वर्षश्राद्धाऐवजी आजी-आजोबांना केले अन्नदान

सुभाष हाेळकर
रविवार, 11 ऑगस्ट 2019

वडिलांच्या वर्ष श्राद्धाच्या कार्यक्रमावर खर्च करण्यापेक्षा वृद्धाश्रमातील आजी-आजोबांना अन्नदान करून शिवना (ता. सिल्लोड) येथील ज्ञानेश्वर भाऊराव काळे या प्रगतिशील शेतकऱ्याने एक नवा पायंडा पाडला. तेरवी किंवा वर्ष श्राद्धाच्या कार्यक्रमात जेवणासाठी आमंत्रण देऊनही आमंत्रित लोक जेवायला हजेरी लावत नाहीत ही वस्तुस्थिती आहे.

शिवना (जि. औरंगाबाद) : वडिलांच्या वर्ष श्राद्धाच्या कार्यक्रमावर खर्च करण्यापेक्षा वृद्धाश्रमातील आजी-आजोबांना अन्नदान करून शिवना (ता. सिल्लोड) येथील ज्ञानेश्वर भाऊराव काळे या प्रगतिशील शेतकऱ्याने एक नवा पायंडा पाडला. तेरवी किंवा वर्ष श्राद्धाच्या कार्यक्रमात जेवणासाठी आमंत्रण देऊनही आमंत्रित लोक जेवायला हजेरी लावत नाहीत ही वस्तुस्थिती आहे.

परिणामी बरेचसे अन्न वाया जाते. ही बाब हेरून श्री. काळे यांना त्यांचे भाऊजी काकासाहेब खरात, पुणे येथील उद्योजक भाऊ रामचंद्र काळे, डॉ. सुभाषचंद्र काळे यांनी वृद्धाश्रमात अन्नदान करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार श्री. काळे यांनी आपले वडील भाऊराव रावजी काळे यांच्या वर्षश्राद्धाचा कार्यक्रम औरंगाबाद येथील पैठण रस्त्यावरील मातोश्री वृद्धाश्रमात वेगळ्या पद्धतीने पार पडला.

तेराव्याचे, दहाव्याचे, श्राद्धाचे जेवण चालत नाही, वेळ नाही, नंतर येतो अशी विविध कारणे सांगुन जेवायला येणारे आमंत्रित येणे टाळतात. त्यामुळे ज्याला अन्नाची गरज आहे, त्याला अन्नदान करून काळे परिवाराने नवा पायंडा पाडला. आश्रमातील आजी-आजोबांसह अधिकारी व कर्मचारी वर्ग असे मिळून एकूण सव्वाशे ते दीडशे जणांना दुपारचे मिष्टान्न भोजन देऊन प्रत्येक सदस्यास अंगाची व कपड्याची साबण, खोबरेल तेल, टूथपेस्ट व बिस्किटांची पाकिटे भेट देण्यात आली. यावेळी एकनाथ राऊत, डॉक्‍टर काळे, भाऊसाहेब काळे, रावसाहेब काळे, डॉक्‍टर अविनाश काळे, शेषराव काळे, दादाराव जाधव आदींची उपस्थिती होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: son feed grantparents in memory of father