उदगीर - माजी उपसभापतींच्या मुलाचा भोसकून खून  

सचिन शिवशेट्टे 
बुधवार, 20 जून 2018

उदगीर (लातूर) : कृषी उत्पन्न बाजार समीतीचे माजी उपसभापती व संस्थाचालक ज्ञानोबा केंद्रे यांचा मुलगा आशीष ज्ञानोबा केंद्रे (वय २८) याचा मंगळवारी (ता.१९) रात्री पावणे दहा वाजता सत्तूरने भोसकुन खून करण्यात आला. घटनेनंतर आरोपी  सत्तुर सह शहर पोलीस ठाण्यात हजर झाल्याने पोलिसांची धावपळ उडाली. 

शासकीय आध्यापक विद्यालयाजवळील ज्ञानोबा केंद्रे यांचे घर आहे. मंगळवारी रात्री त्यांचा एकुलता एक मुलगा आशीष याला काम आहे, म्हणुन घराच्या बाहेर बोलावुन घेऊन आरोपी साईनाथ गोपीनाथ इंगळेवाड (रा. डोंगर शेळकी, ता.उदगीर ), सागर डोंगरे, साधु कांबळे आणि प्रेम जवळगेकर यांनी सत्तूरने सपासप वार  केले. या हल्ल्यात आशीषचा जाग्यावरच मृत्यु झाला. त्यानंतर आरोपी इंगळेवाड यांने हातात सत्तुर घेउन शहर पोलीस ठाण्यात जाऊन खुनाची कबुली दिली. पैशाच्या कारणावरुण मुलाचा खुन केल्याची फिर्याद ज्ञानोबा केंद्रे यांनी दिल्यावरुन शहर पोलीस ठाण्यात चौघांविरूद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात इंगळेवाड आणि सागर डोंगरेला पोलिसांनी अटक केली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय सुर्यवंशी तपास करत आहेत.

Web Title: son of former deputy speaker killed in udagir latur