नारळपाण्यातून दिले जन्मदात्यांना विष

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 16 जून 2018

लातूर : जन्मदात्या आई-वडिलांना नारळपाण्यातून विष देऊन त्यांचा खून करण्याचा प्रयत्न मुलाने केला. यात वडिलांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर आईची प्रकृती अद्याप गंभीर आहे. याबाबत शिवाजी नगर पोलीस स्टेशनमध्ये मुलाविरुद्ध शुक्रवारी रात्री खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पोलिसांनी मुलाला ताब्यात घेतले असून त्याला आज न्यायालयात हजर केले जाणार आहे.

मोरे नगर भागातील आपल्या घरात साधुराम कोटंबे (वय 72) हे पत्नी गयाबाई यांच्यासोबत बसले होते. या वेळी मुलगा ज्ञानदीप ( वय 29) याने बाहेरून नारळपाणी आणून आई-वडिलांना दिले. ते पिताना नारळपाणी कडवट लागत आहे, असे आई-वडिलांनी सांगितले. मात्र, मुलाने नारळपाण्याची चव अशीच असते, असे उत्तर दिले. आईने थोडे पाणी पिऊन ते बाजूला ठेवले; मात्र वडिलांनी पूर्ण पिऊन टाकले. थोड्या वेळाने त्यांची प्रकृती बिघडली. म्हणून रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान वडिलांचा मृत्यू झाला. आईच्या जबाबावरून पोलिसांनी मुलाला ताब्यात घेतले. मालमत्तेच्या वाटणीवरून मुलाने हे कृत्य केल्याचे समोर आले आहे.

कोटंबे यांना 2 मुली आणि 3 मुलं आहेत. यापैकी सर्वांत लहान असलेल्या मुलाने कोटंबे यांना नारळ पाण्यातून विष दिले. त्याचे दीड महिन्यापूर्वीच लग्न झाले होते.

Web Title: son give poison to his parents