शेत नावावर न केल्याने वडिलांचा खून 

बाबासाहेब ठोंबरे,
शनिवार, 19 मे 2018

पीरबावडा : शेतजमीन नावावर करून देण्यास नकार देणाऱ्या वडिलांचा मुलांने खून केला. पुरावे नष्ट करण्यासाठी मुतदेह जाळून टाकण्याचा प्रयत्न केला. आज (शनिवारी) पाहटे तीन वाजता फुलंब्री तालुक्‍यातील पिरबावडा येथे ही घटना घडली. पुतण्याने हा प्रकार पाहील्यामुळे ही घटना उघडकीस आली असून आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे. 

पिरबावडा येथील नारायण लक्ष्मण गाडेकर (वय48) यांचा मुलगा सतीश गाडेकर (वय 30) काही दिवसापासून वडीलांकडे शेत नावावर करण्याचा मागणी करीत होता. मात्र वडिलांनी जमीन नावावर करण्यास नकार देत होते. काल (शुक्रवारी) याच विषयांवर वडील आणि सतीशचे भांडण झाले. या भांडणानंतर वडील शेती झोपायला गेले. सतीश पहाटे तीन वाजेच्या सुमारास शेतात गेला व त्यांनी वडील नारायण गाडेकर यांना जबर मारहाण केली आणि यातच त्यांचा मुत्यृ झाला. यानंतर घाबरलेल्या सतीशने कोणाला हा प्रकार कळू नयेत म्हणून वडीलांचा मृतदेह जाळाला. याच वेळी मृत नारायण गाडेकर यांचा पुतण्या शेताकडे जात असताना त्यांनी हा प्रकार पाहीला आणि तात्काळ वडोद बाजार पोलिस ठाण्यास ही माहिती कळवली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत नारायण गाडेकर यांच्या खुना प्रकरणी मुलगा सतीश गाडेकर यांना ताब्यात घेतले आहे.

Web Title: son killed his father for farm