सासरवाडीच्या छळाने जावयाची आत्महत्या 

प्रल्हाद कांबळे
बुधवार, 4 जुलै 2018

दिलेले पैसे परत येत नाहीत व हाताला काम नाही या दुहेरी अडचणीत सापडलेल्या विनायक कदम यांनी नैराशेतून मंगळवारी रात्री आपल्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.

नांदेड - सासरवाडीच्या त्रासाला कंटाळून एका जावयाने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंत्रीनगर भागात मंगळवारी (ता. 3) रात्री घडली. सासरा, पत्नी आणि मेव्हना यांच्यावर भाग्यनगर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

भाग्यनगर ठाण्याच्या हद्दीत असलेल्या मंत्रीनगरमध्ये विनायक किशनराव कदम (वय 22) हे आपल्या परिवारासह राहत होते. त्यांनी आपल्याकडील बोलेरो जीप व काही सोन्याचे दागिणे विकून त्यांनी सासऱ्याना पैसे दिले होते. दिलेले पैसे ते परत मागत असल्याने त्यांच्याच व विनायक कदम यांच्यात वाद होत असे. पैसे मागण्यासाठी तो सासरवाडीला गेला असता त्यांना सासरा व मेव्हण्याने मारहाण केली. तसेच त्यांच्या पत्नीस फारकत घेण्यास परावृत्त करीत होते. दिलेले पैसे परत येत नाहीत व हाताला काम नाही या दुहेरी अडचणीत सापडलेल्या विनायक कदम यांनी नैराशेतून मंगळवारी रात्री आपल्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी किशन हौसाजी कदम यांच्या फिर्यादीवरून भाग्यनगर ठाण्यात आत्महत्येस कारणीभूत ठरल्याप्रकरणी सासरे नामदेव करडे, मेव्हणा संजु करडे आणि पत्नीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक सी. जी. ढेमकेवाड हे करीत आहेत. 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: son in law suiside at nanded

टॅग्स