बापाने केला मुलाचा खून

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 डिसेंबर 2018

सिल्लोड - शेतजमीन नावावर करून देण्यावरून बाप-मुलात सतत होत असलेल्या वादातून रागाच्या भरात बापाने मुलाच्या डोक्‍यात टिकमाचा दांडा मारला. जखमी अवस्थेत मुलाला रुग्णालयात दाखल करण्यात आले; पण घटनेनंतर चार दिवसांनी उपचारादरम्यान मुलाचा मृत्यू झाला. या प्रकरणी मुलाची आई अनिता कौतिक मिरगे यांनी सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्यात गुरुवारी (ता. सहा) फिर्याद दाखल केली. त्यावरून बाप कौतिक मिरगे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, रात्री उशिरा त्यास अटक करण्यात आली आहे.

फिर्यादित म्हटले आहे की, कौतिक मिरगे, विजय मिरगे (वय २२) या बाप-लेकात शेतजमीन नावावर करून देण्यावरून सतत भांडणे होत होती. मुलगा विजय यास साडेतीन एकर शेती कसण्यासाठी दिलेली होती; परंतु कौतिक मिरगे हे त्याला कसण्यासाठी दिलेल्या शेतीतील माल विकून पैसे स्वतः घेत. याच कारणावरून शनिवारी (ता. एक) संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास बाप-मुलात जोरात भांडण झाले. रात्री साडेआठच्या सुमारास परत भांडण सुरू झाल्यानंतर कौतिक मिरगे यांनी घरातील टिकमाचा दांडा काढून विजयच्या डोक्‍यात मारला. त्याच्या डोक्‍यातून, नाका-कानातून रक्तस्राव सुरू झाल्यानंतर आईने आरडाओरडा केला. ग्रामस्थांनी विजयला सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.

प्रथमोपचार करून त्यास औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे उपचारादरम्यान बुधवारी (ता. पाच) त्याचा मृत्यू झाला. त्याच्यावर वरूड येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

क्रौर्याची सीमा पार
मृत विजय यास सहा वर्षांचा आदर्श नावाचा मुलगा असून, त्याची पत्नी दुसऱ्या बाळंतपणासाठी माहेरी गेलेली आहे. आजोबाने क्रौर्याची सीमा पार केल्यामुळे आदर्श, तसेच जन्म घेण्याआधीच दुसरे अपत्य पितृछायेस मुकले आहे.

Web Title: Son Murder by father