पोटच्या गोळ्याकडून आईवर तीन महिने अत्याचार

Aurangabad news
Aurangabad news

औरंगाबाद : पोटच्या गोळ्याकडून मायलेकाच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारी घटना शहरात घडली आहे. मुलाने आपल्यावर वारंवार अत्याचार केल्याची फिर्याद दुर्दैवी मातेने सिडको पोलिस ठाण्यात दाखल केली आहे. पोलिसांनी या प्रकरणी बलात्काराचा गुन्हा दाखल करून नराधम मुलाला अटक केली.

ही घटना मंगळवारी (ता. 10) रात्री उघडकीस आली. विशेष म्हणजे, नराधम मुलगा तीन-चार महिन्यांपासून आईला ठार मारण्याची धमकी देत तिच्यावर वारंवार अत्याचार करित असल्याचे समोर आले आहे.

प्रकरणात खासगी रुग्णालयात शिपाई म्हणून कार्यरत 44 वर्षीय पीडित मातेने तक्रार दिली. तक्रारीत म्हटले आहे, की गेल्या दोन-तीन महिन्यांपासून मुलगा वारंवार अत्याचर करीत आहे. त्यामुळे पीडितेने ही बाब कोणाला सांगितली नाही. 10 डिसेंबर रोजी सायंकाळी पीडिता कामावरुन घरी परतली. नेहमीप्रमाणे स्वयंपाक आवरुन आराम करीत होती. त्यावेळी नराधम मुलगा दारु पिऊन आला. त्याने आईला मारहाण करून अत्याचार केला. त्यानंतर तू ही घटना कोणास सांगितल्यास मी तुला मारुन टाकीन किंवा मी मरुन जाईन, अशी धमकी दिली. नेहमी होणाऱ्या त्रासाला कंटाळून पीडितेने अखेर मंगळवारी पोलिस ठाणे गाठुन तक्रार दिली. 

पोलिसांनी आरोपी नराधमाला बुधवारी अटक करुन न्यायालयात हजर केले. सुनावणीवेळी सहाय्यक सरकारी सय्यद शहनाज यांनी आरोपीची वैद्यकीय तपासणी बाकी असल्याने पोलिस कोठडी देण्याची विनंती न्यायालयाकडे केली. विनंती मान्य करुन प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. यु. न्याहारकर यांनी आरोपीला शुक्रवारपर्यंत (ता.13) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

दारुड्याची बहिणींनाही मारहाण

पीडितेच्या पतीचे सात वर्षांपूर्वी निधन झाले असून, तिला दोन मुली व दोन मुले आहेत. त्यातील मोठ्या मुलीचे लग्न झाले असून, दुसरी मुलगी मुंबई येथे कंपनीत काम करुन उदरनिर्वाह करते. तर या 20 वर्षीय विकृत मुलाला दारूचे व्यसन आहे. तो काही कामधंदा न करता दारु पिण्यासाठी पैसे न दिल्यास पिडितेला मारहाण करतो. पिडितेच्या मुलीदेखील सुट्ट्यांमध्ये घरी आल्या असता त्यांनादेखील मारहाण करतो, असे पिडित आईने तक्रारीत नमूद केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com