esakal | पैशासाठी पोटच्या मुलाने बापाचा विष पाजून गळा आवळण्याचा केला प्रयत्न
sakal

बोलून बातमी शोधा

beed crime news

पैशासाठी पोटच्या मुलाने बापाचा विष पाजून गळा आवळण्याचा केला प्रयत्न

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बीड: पन्नास हजार रुपये न दिल्याने वृद्ध पित्यास घरात डांबून विष पाजून नंतर तारीच्या सहाय्याने गळा आवळून घरात धूर करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला (crime news in beed). ही घटना पेठपांगरा (ता. आष्टी) येथे एप्रिल महिन्यात घडली असून, शनिवारी (ता. आठ) गुन्हा नोंद करण्यात आला. उपचार सुरू असणाऱ्या वृद्धाच्या जबाबावरून मुलगा, सून व नातवावर अंमळनेर ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.

काशीनाथ वाल्हू मिसाळ (८५, रा.पेठपांगरा ता.आष्टी) असे त्या वृद्धाचे नाव आहे. त्यांचा मुलगा भीवसेन काशीनाथ मिसाळ हा ऊसतोड मजूर आहे. एप्रिल २०२१ मध्ये मुलाने त्यांना ५० हजार रुपयांची मागणी केली होती. मात्र, काशीनाथ यांनी पैसे देण्यास नकार दिला होता. त्यामुळे २० एप्रिलला चिडलेल्या मुलाने पत्नी कांताबाई व मुलगा सोमीनाथ यांच्या मदतीने काशीनाथ यांना घरात डांबले. त्यांना बळजबरीने विष पाजले व नंतर तारीच्या साहाय्याने गळा आवळला. एवढेच नाही तर घरात जुन्या पिशव्या जाळून धूर करून दरवाजा बंद करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला.

हेही वाचा: धक्कादायक! बीडमध्ये कोरोना मृत्यूनोंद आणि अंत्यसंस्कारात १०५ ची तफावत

काशीनाथ मिसाळ यांच्यावर शेवगाव (जि. अहमदनगर) येथे उपचार सुरू असून, त्यांच्या जबानीवरून या तिघांविरोधात अंमळनेर ठाण्यात शुक्रवारी गुन्हा नोंद करण्यात आला. दरम्यान, काशीनाथ मिसाळ यांचे कुटुंब पेठपांगरा येथे शेतात वास्तव्यास आहे. २० एप्रिल रोजी दुपारी त्यांच्या घरातून धूर निघत असल्याचे पाहून शेजाऱ्यांनी धाव घेतली. त्यानंतर मुलगा भीवसेन यास फोन करून बोलावून घेतले गेले. त्यानंतर काशीनाथ यांना रुग्णालयात हालविण्यात आले. आरोपी फरार असून शोध सुरू असल्याचे सहायक निरीक्षक श्यामकुमार डोंगरे यांनी सांगितले.

loading image