वडिलांना गावठी पिस्तुलाचा धाक दाखवून जिवे मारण्याची धमकी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 जुलै 2018

सेनगाव येथील समतानगर भागामध्ये भगवान राजाराम खाडे ही राहतात. मागील काही दिवसापासून त्यांचा मुलगा राजेश भगवान खाडे याच्यासोबत पैशाच्या कारणावरून वाद होत होता. या वादामुळे राजेश हा नांदेड येथे राहण्यासाठी गेला आहे.

हिंगोली : सेनगांव येथील समतानगर भागात वडिलांनाच गावठी पिस्तुलाचा धाक दाखवून पैसे मागणाऱ्या मुलासह अन्य दोघांवर सेनगाव पोलिस ठाण्यात बुधवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला आहे.

सेनगाव येथील समतानगर भागामध्ये भगवान राजाराम खाडे ही राहतात. मागील काही दिवसापासून त्यांचा मुलगा राजेश भगवान खाडे याच्यासोबत पैशाच्या कारणावरून वाद होत होता. या वादामुळे राजेश हा नांदेड येथे राहण्यासाठी गेला आहे. बुधवारी तारीख 18 रात्री राजेश व त्याचा मेहुणा  संतोष भिमराव फड व अन्य जण सेनगाव येथे आले. त्यांनी भगवान खाडे यांच्याकडे पैशाची मागणी केली मात्र त्यांनी पैसे देण्यास नकार दिल्यानंतर राजेश खाडे याने गावठी पिस्तुलाचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली.

या प्रकारानंतर घाबरलेल्या भगवान खाडे यांनी घरातून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला असता राजेश खाडे व संतोष फड यांनी दरवाजात उभा राहून त्यांचा रस्ता अडवला. त्यानंतर भगवान खाडे यांनी तातडीने सेनगाव पोलीस ठाण्यात माहिती दिली. पोलीस निरीक्षक सरदारसिंग ठाकूर यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिस आल्याचे लक्षात येतात तिघांनीही गावठी पिस्तूल  व काडतूस फेकून पळ काढला. पोलिसांनी एक गावठी पिस्तूल व तीन जिवंत जप्त केले आहे. याप्रकरणी श्री. खाडे यांच्या तक्रारीवरून राजेश भगवान खाडे संतोष भिमराव फड (रा. आशिर्वाद नगर नांदेड) व अन्य एका विरुद्ध सेनगांव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस निरीक्षक सरदारसिंग ठाकूर पुढील तपास करीत आहेत.

Web Title: son warned father in Hingoli