सोनपेठ येथे जिल्हाधिकाऱ्यांची रेतीचोरांवर कारवाई

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 5 मे 2018

सोनपेठ (परभणी) : तालुक्यातील खडका येथे अवैधरित्या रेती चोरणाऱ्या चोरट्यावर जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांनी कडक कारवाई केली. मध्यस्थी करणाऱ्या गावातील नेत्यास पोलीसांच्या छड्यांचा प्रसाद ही त्यांनी द्यायला लावला. जिल्हाधिकारी शिवशंकर यांची बदली झाल्यानंतर सोनपेठ तालुक्यातील रेती चोरांनी मोठा जल्लोष केला होता. त्यांची बदली झाल्याच्या संधीचा फायदा घेत मोठ्या प्रमाणावर रेती चोरी सुरु करण्यात आली होती.

जिल्हाधिकारी खडका येथे शनिवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास अचानक दाखल झाले. यामध्ये गोदावरीच्या पात्रात रेती चोरणाऱ्या तीन ट्रॅक्टरवर कारवाई केली. एक ट्रॅक्टर निसटले परंतु, दोन ट्रॅक्टर, एक मोटारसायकल, मोबाईल तसेच एक ट्रॅक्टर चालक यांना सोनपेठ पोलीसांच्या ताब्यात दिले. या वेळी ट्रॅक्टर सोडण्यासाठी मध्यस्थी करणाऱ्या गावातील नेत्याला जिल्हाधिकारी यांनी शांत राहण्यास सांगितले. परंतु, त्याने जिल्हाधिकारी यांच्याशी वाद घालण्याचा प्रयत्न करताच सोबतच्या पोलिसांनी गावनेत्यास लाठ्यांचा प्रसाद दिला. या बाबत सोनपेठ पोलिसांत सुचना दिल्या असुन महसुल प्रशासन रेती चोराविरुध्द गुन्हा दाखल करणार असल्याचे सांगितले.

सिंघम जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांनी कठोर कारवाई करुन रेती चोरांना आपले मनसुबे दाखवुन दिल्याने तालुक्यातील रेती चोर धास्तावले आहेत.

Web Title: sonpeth parbhani news