दक्षिण-मध्य रेल्वेकडून १४६ विशेष गाड्या

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 मे 2018

नांदेड - दक्षिण-मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाने उन्हाळी सुट्यांकरिता अपेक्षित गर्दी आणि प्रवाशांच्या सुविधेसाठी १४६ विशेष गाड्या चालविण्याचे ठरविले आहे.

नांदेड - दक्षिण-मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाने उन्हाळी सुट्यांकरिता अपेक्षित गर्दी आणि प्रवाशांच्या सुविधेसाठी १४६ विशेष गाड्या चालविण्याचे ठरविले आहे.

नांदेड येथून दिल्लीला जाण्याकरिता २४ गाड्या सोडण्यात येणार आहेत. नांदेड ते हजरत निझामुद्दीन (दर गुरुवारी) नांदेड रेल्वे स्थानकातून रात्री  अकराला सुटेल आणि पूर्णा मार्गे निझामुद्दीन येथे शनिवारी मध्यरात्रीनंतर दोनला पोचेल. निझामुद्दीन ते नांदेड गाडी (दर शनिवारी) निझामुद्दीन स्थानकावरून सकाळी सहाच्या सुमारास सुटेल. पनवेल ते नांदेड गाडी (दर रविवारी) ता. सहा मेपासून सकाळी दहाला पनवेल येथून सुटेल. नांदेड येथून जबलपूर आणि सिकंदराबादला जाण्याकरिता १७  गाड्या सोडल्या आहेत. नगरसोल ते तिरुपती आणि नांदेड ते तिरुपती गाडीच्या २६ फेऱ्या होणार आहेत. तिरुपती येथून ही रेल्वे दर शुक्रवारी सकाळी साडेसातला सुटेल, तर नगरसोल येथून दर शनिवारी रात्री दहाला सुटेल. हुजूर साहेब नांदेड - तिरुपती - हुजूर साहेब नांदेड अशा ( २७ फेऱ्या) होणार आहेत. हैदराबाद - नांदेड-जयपूर-हैदराबाद या उन्हाळी विशेष गाडीच्या २६ फेऱ्या होणार असून ही गाडी हैदराबाद येथून दर शुक्रवारी साडेचारला सुटेल आणि दुसऱ्या दिवशी जयपूर येथे तीनला पोचेल. नांदेड येथून मध्यरात्री एकला सुटेल. ही गाडी जयपूर येथून दर रविवारी दुपारी तीनला सुटेल आणि मंगळवारी हैदराबादला पहाटे दोनला पोचेल.

Web Title: south central railway