दक्षिण-मध्य रेल्वेला औरंगाबादचा तिटकारा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 मे 2018

औरंगाबाद - मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबाद शहराला दक्षिण-मध्य रेल्वेने पुन्हा डावलले आहे. नांदेड विभागाने उन्हाळ्यासाठी तब्बल 146 रेल्वेगाड्या सुरू केल्या. मात्र, त्यातील एकही रेल्वे औरंगाबाद, जालनावासीयांना मिळाली नाही. विशेष रेल्वेची मागणी असतानाही, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने संताप व्यक्त केला जात आहे. दक्षिण-मध्य रेल्वेकडून केवळ भाषिक वादाने मराठवाड्यावर सातत्याने अन्याय केला जात असल्याचा आरोप आहे. मुंबईला जाण्यासाठी केवळ देवगिरी एक्‍स्प्रेस, नंदीग्राम एक्‍स्प्रेस, तपोवन, जनशताब्दी एक्‍स्प्रेस या चार गाड्या आहेत. मुंबईसाठी आणखी रेल्वे सुरू कराव्यात, अशी मागणी सातत्याने होत आहे.
Web Title: south central railway