esakal | सोयाबीन​ किडीचा प्रादुर्भाव झालाय, काळजी करु नका...
sakal

बोलून बातमी शोधा

सोयाबी पिकावर किडीचा प्रादुर्भाव.jpg

सोयाबीनवरील किडीचे नियंत्रण करण्यासाठी जिंतूरचे तालुका कृषी अधिकारी एस.पी.काळे यांनी शेतकऱ्यांना सल्ला दिला आहे. यानुसार नियोजन केल्यास काही प्रमाणात काळजी दूर होऊ शकते

सोयाबीन​ किडीचा प्रादुर्भाव झालाय, काळजी करु नका...

sakal_logo
By
राजाभाऊ नगरकर

जिंतूर (जि.परभणी) : बेताचा पाऊस व पोषक हवामान यामुळे तालुक्यातील पीक परिस्थिती समाधानकारक आहे. सोयाबीन हे तालुक्यातील मुख्य पिकापैकी एक आहे. परंतू, या पिकावर किडीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्याने शेतकरी चिंतेत दिसत आहे. या पिकावरील किडीच्या नियंत्रणासाठी तालुका कृषी अधिकारी एस.पी.काळे यांनी विविध उपाययोजना अंमलात आणण्याचा सल्ला शेतकऱ्यांना दिला आहे.

असे करा नियंत्रण
चक्रीभुंगा : या किडीचा प्रौढ मादी भुंगेरा सोयाबीन पिकाचा देठ, फांदी किंवा मुख्य खोडावर अंडी घालण्यासाठी दोन समांतर खापा करून त्यामध्ये अंडी घालतो. त्यामुळे जमिनीतील अन्नपुरवठा बंद होतो आणि खापाच्या वरचा भाग वाळून जातो. या चक्री कापात चक्रीभुंग्याचा मादी भुंगेरा आठ ते ७२ अंडी घालतो. भुंग्याची अळी खोडातील पूर्ण गर खात असल्याने शेंगा (फोल) होप होतात. त्यामुळे उत्पादनात लक्षनीय घट येते. करिता या किडीच्या नियंत्रणासाठी किडीचा प्रादुर्भाव नुकसान पातळीच्या आत असल्यास शेतकऱ्यांनी बाधित झाडे किंवा प्रादुर्भावग्रस्त झाडांचे भाग काढून टाकावेत. पानाच्या विशिष्ट सुकन्यापासून या पद्धतीचा पंधरा दिवसातून दोनवेळा अवलंब केल्यास होणाऱ्या नुकसानीचे प्रमाण कमी करता येते. तसेच पाच टक्के लिंबोळी अर्क फवारणी करावी. 
किडीने नुकसानीची पातळी ओलांडली असल्यास ट्रायझोफॉस ४० ई.सी.१६ मिली. प्रति १० लिटर पाणी अथवा थायक्लोप्रीड २१.७ एस.सी.१५ मिली.प्रति १० लिटर अथवा क्लोऱ्यानट्रानीप्रोल १८.५ एस.सी. १५० मिली. प्रति हेक्टर अथवा थायमेथोक्झाम १२.६ टक्के अधिक १२.६  ल्याम्बडा सायहॅलोथ्रीन ९.५ टक्के, झेड.सी. २.५  ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून वैकल्पीकरित्या फवारावे. प्रादुर्भाव दिसताच सात ते दहा दिवसात वरील किटक नाशकांची फवारणी करावी. 

हेही वाचा - मराठवाड्याच्या बातम्या वाचण्यासाठी या लींकवर क्लिक करा 

उंटअळी : सोयाबीनवर उंट अळीचा प्रादुर्भाव दिसताच पाच टक्के लिंबोळी अर्काची फवारणी करावी अथवा २० ग्रॅम बी.टी. प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. 

तंबाखूवरील पाने खाणारी अळी : तंबाखूवरील पाने खानाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास प्रोफेनोफॉस ५० ई.सी.२५ मिली, प्रति १० लिटर पाणी अथवा इंडोक्झाकार्रब १५.८ टक्के ई.सी. सात मिली प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. त्याचप्रमाणे शेतकरी बांधवानी कृषि विद्यापीठाने शिफारस केलेल्याच कीडनाशकाचा फवारणीसाठी वापर करावा, अशी सूचनादेखील तालुका कृषि अधिकारी काळे यांनी केली.

संपादन - सुस्मिता वडतिले 

loading image
go to top