esakal | सोयाबीनच्या भावाची नाही 'हमी', क्विंटलमागे पाचशेचा फटका, माजलगाव मोंढ्यातले चित्र!  
sakal

बोलून बातमी शोधा

Majalgaon news.jpg

माजलगावच्या मोंढ्यात सोयाबीनची आवक वाढली आहे. अवघ्या दहा दिवसात सात कोटी ६७ लाख ७१३६ रूपयांच्या बावीस हजार ९३४ क्विंटल सोयाबीनची खरेदी मोंढ्यात करण्यात आली आहे. एकीकडे हवामान खात्याने वर्तविलेला पावसाचा अंदाज, दुसरीकडे सोयाबीन काढणीसाठी मजुर व मशिन उपलब्ध होत नसल्याने शेतकरी त्रस्त झाला आहे. 

सोयाबीनच्या भावाची नाही 'हमी', क्विंटलमागे पाचशेचा फटका, माजलगाव मोंढ्यातले चित्र!  

sakal_logo
By
कमलेश जाब्रस

माजलगाव (जि. बीड) : लागवडीपासूनच संकटात असलेल्या सोयाबीनला शासनाने जाहीर केलेला हमीभाव मिळत नसल्याने सोयाबीन उत्पादक शेतक-यांचे क्विंटलमागे तीनशे ते पाचशे रूपयांचे नुकसान होत आहे. 1 ते 10 ऑक्टोंबर या दहा दिवसांच्या कालावधीमध्ये सात कोटी रूपयांच्या बावीस हजार 934 क्विंटल सोयाबीनची खरेदी मोंढ्यात करण्यात आली आहे. 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!
तालुक्यामध्ये यावर्षी मृग नक्षत्रावर दमदार पाउस झाला. शेतक-यांनी मोठ्या प्रमाणावर अवघ्या तीन ते चार महिण्यात येणारे पिक असल्याने सोयाबीनची मोठ्या प्रमाणावर लागवड केली. काही शेतक-यांचे सोयाबीन उगवलेच नाही. त्यामुळे दुबार पेरणी केली परंतु त्यातही पावसाने दिलेल्या खंडामुळे दुबार पेरणी करूनही फायदा झाला नाही. त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला होता. पण थोड्या प्रमाणात का होईना राहिलेल्या सोयाबीनला शेतक-यांनी लेकरां- बाळांप्रमाणे सांभाळले आणि परत आता काढणीस आलेल्या, काढत असलेल्या सोयाबीनवर सध्या बरसत असलेल्या पावसामुळे संकट ओढावले आहे. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर सोयाबीन काढणीचे काम युध्द पातळीवर सुरू आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

परिणामी माजलगावच्या मोंढ्यात सोयाबीनची आवक वाढली आहे. अवघ्या दहा दिवसात सात कोटी ६७ लाख ७१३६ रूपयांच्या बावीस हजार ९३४ क्विंटल सोयाबीनची खरेदी मोंढ्यात करण्यात आली आहे. एकीकडे हवामान खात्याने वर्तविलेला पावसाचा अंदाज, दुसरीकडे सोयाबीन काढणीसाठी मजुर व मशिन उपलब्ध होत नसल्याने शेतकरी त्रस्त झाला आहे. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

म्हणायला हमीभाव मिळतोय कमीच भाव

शासन सोयाबीन खरेदी करण्यासाठी खरेदी केंद्र सुरू केल्याच्या घोषणा करत आहे. प्रत्यक्षात मात्र ना सोयाबीन खरेदी केंद्र सुरू झाले, ना खरेदी केलेल्या सोयाबीनला 3880 रूपये क्विंटल हमीभाव मिळतोय. प्रत्यक्षात शेतक-यांना 2700 ते 3751 रूपये एवढाच भाव शेतक-यांना मिळत आहे. 


मोंढ्यामध्ये सोयाबीनची विक्रमी आवक असून पावसामुळे शेतकरी सोयाबीन विक्रीसाठी घाई करत आहेत. ओले सोयाबीन असल्यामुळे त्याला भाव आर्द्रतेनुसार मिळत आहे. वाळलेल्या सोयाबीनला सर्वाधिक 3751 प्रतिक्विंटल इतका भाव मिळत आहे. भावामध्ये अडचणी असल्यास बाजार समितीशी शेतक-यांनी संपर्क साधावा. 
- हरिभाउ सवणे, सचिव बाजार समिती.

(संपादन-प्रताप अवचार)