अंबड - खाकी वर्दीतील पोलिस अधिकारी, कर्मचारी आपल्या कर्तव्यावर असताना अनेकदा माणुसकी मनात जोपासत खऱ्या अर्थाने माणुसकीचे दर्शन घडवीत आहेत. पोलिस जनतेचा मित्र म्हणुन आपली भुमिका नेहमीच पार पाडत आहे.
याचाच प्रत्यय गुरूवारी (ता.17) दुपारच्या कडक उन्हात साडेतीन वाजेच्या सुमारास परभणीचे पोलीस अधीक्षक रविंद्रसिंग परदेशी हे छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय कामकाज आटोपून अंबड-घनसावंगी मार्गे परत परभणीकडे जात होते.
त्यांना अंबड शहरापासून काही अंतरावर असलेल्या घनसावंगी फाट्यावर भर उन्हात एक 90 वर्षाची वयोवृध्द आजी नजरेस पडली. वाढती प्रचंड उष्णता डोक्यावर मार्तंड तापलेला अशातच अंगाची लाही लाही होऊन घशाला कोरड पडावी. अशा परिस्थितीमध्ये वयोवृध्द आजीच्या पायातील चपलाचे भान आजीचे हरपलेले.
अंगात रग नसल्याने ती आजी तिच्याच विश्वात होती. त्यातच आजीला ठळकपणे बोलता येत नसल्याने तोंडातून शब्द फुटत नव्हते. हे सगळे दृश्य वाहनातून जात असलेल्या खाकी वर्दीतील पोलिस अधिकारी परदेशी यांच्या नजरेस पडताच त्यांनी आपले वाहन तात्काळ रस्त्याच्या कडेला थांबविले.
आजीजवळ जावून स्वतःजवळ असलेले पाणी पाजून त्यांची आस्थेवाईकपणे चौकशी केली. रस्त्यालगत असलेल्या झाडाखाली स्वतःच्या हाताने आधार देत सावलीत बसविले. आजीच्या अस्ताव्यस्त पडलेल्या चपला, काठी आणि पिशवी हातात घेऊन झाडाखाली नेऊन मदत केली.
त्यानंतर पोलीस अधीक्षक परदेशी यांनी अंबड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी आयपीएस सिद्धार्थ बारवाल यांना भ्रमणध्वनीवरून संपर्क करून त्यांनी या आजीला उपचारासाठी हलविण्याच्या सूचना केल्या.
तात्काळ बारवाल यांनी कोणताही विलंब न करता तातडीने पोलीस हवालदार विष्णू चव्हाण व स्वप्नील भिसे यांना घटनास्थळी शासकिय वाहनातून पाठविले.
पोलिसांचे वाहनात घटनास्थळी असलेल्या पोलीस अधीक्षक परदेशी यांनी वृद्ध आजीला पोलीस वाहनात बसवून दिले. त्यानंतर ते परभणीकडे मार्गस्थ झाले. पोलीस अधीक्षक परदेशी यांनी अंगातील खाकी वर्दीतील माणुसकीचे दर्शन घडविले. त्यांनी दिलेल्या हाकेला अंबडच्या खाकी वर्दीतील अधिकारी, पोलिस कर्मचारी यांनी कोणताच विलंब न करता कार्य तत्परता दाखविली हे विशेष आहे.
अंबड पोलीस यांनी वृद्ध आजीला अंबड शहरातील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आजी अंबड तालुक्यातील बेलगांव येथील असल्याचे समजते. खाकी वर्दीने समाजात माणुसकीचे दर्शन घडविले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.