गोपीनाथगडावर सेनेच्या बाणाच्या निशाणावर कमळ!

प्रवीण फुटके
मंगळवार, 5 नोव्हेंबर 2019

राज्यातील राजकिय कुरघोड्या, निसर्गाच्या दुष्टचक्राने शेतीचे नुकसान आणि यातच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गोपीनाथगडावर येऊन दर्शन घेत आहेत.

परळी (बीड) : राज्यातील राजकिय कुरघोड्या, निसर्गाच्या दुष्टचक्राने शेतीचे नुकसान आणि यातच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गोपीनाथगडावर येऊन दर्शन घेत आहेत. ओल्या दुष्काळाच्या पाहणीसाठी येणारे ठाकरे वाट वाकडी करून गडावर येणार असले तरी आज दिवंगत मुंडेंच्या समाधीवर फुलांची काढलेली रांगोळी पाहून यातून काही नवी राजकीय वाट निघेल का अशी चर्चा सुरू झाली आहे.

शिवसेनेची हीच ती शेवटची वेळ !

तसे दिवंगत बाळासाहेब ठाकरे व दिवंगत गोपीनाथराव मुंडे यांच्या पक्षाच्या पुढे जाऊन स्नेह होते. आताच्या पिढीत उद्धव ठाकरे आणि पंकजा मुंडे यांच्यात देखील कौटुंबिक संबंध आहेत. मागच्या विधानसभा निवडणुकीत परळीतून पंकजा मुंडे आणि लोकसभा पोटनिवडणुकीत डॉ. प्रीतम मुंडे यांच्या विरोधात शिवसेनेने उमेदवार दिले नव्हते. बहिणीच्या विरोधात उमेदवार नाही अशी थेट भूमिका उद्धव ठाकरे यांनी घेतली होती.

आता राज्यात शिवसेना - भाजप युतीत तणाव असताना गोपीनाथगडावर उद्धव ठाकरे येत असताना समाधीवर धनुष्यबाणावर कमळ असे चित्र दिसणारी फुलातील रांगोळी साकारली आहे. जिल्ह्यात परतीच्या पावसाने झालेल्या पिकांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी येणारे उद्धव ठाकरे गोपीनाथगडावर जात असल्याने आणि ही रांगोळी व ठाकरे - मुंडे यांचे स्नेह पाहता नवी राजकिय वाट निघणार का हे पाहणे औत्सुक्याचे आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Special rangoli of shivsena and BJP logo on Gopinathgad Beed