झन्ना मन्ना जुगारावर छापा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 जून 2018

नांदेड : शहराच्या एका जुगार अड्डयावर पोलिसांनी छापा टाकून चार जणांना अटक केली. तर दहा जण पसार झाले. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी नाव घाट परिसरात रविवारी (ता. 24) सायंकाळी केली. 

नांदेड : शहराच्या एका जुगार अड्डयावर पोलिसांनी छापा टाकून चार जणांना अटक केली. तर दहा जण पसार झाले. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी नाव घाट परिसरात रविवारी (ता. 24) सायंकाळी केली. 

गोदावरी नदीवर असलेल्या नावघाट पूलाच्या परिसरात स्थानिक गुन्हे शाखेचे एपीआय पांडुरंग भारती यांचे पथक गस्तीवर होते. यावेळी त्यांनी या जुगार अड्डयावर छापा टाकला. यावेळी गजानन मामीडवार, बंटी सिंग बडगुजर, विकेश सोनकांबळे, दयानंद काडबाधे यांना अटक केली. त्यांच्याकडून दहा हजार रुपये रोख व जुगाराचे साहित्य जप्त केले. मात्र पसार झालेले विनोद लिंबाळे, पवन लंकादाई, अग्नीभाऊ जोंधळे, तेजपालसिंग उर्फ तेजा, राजा उर्फ अठ्ठणी कांबळे, जगबीर महाराज, खालेद चाऊस, महेश वाडकर, पप्या आणि सुधा या 14 जणांवर इतवारा ठाण्यात पोलिस कर्मचारी राजू पांगरेकर यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: speculators arrested in nanded