डोळ्यात स्प्रे मारून मोबाईल नेला पळवून

प्रल्हाद कांबळे
रविवार, 9 डिसेंबर 2018

नांदेड : एका मोबाईल शॉपीमध्ये दुकानदाराच्या डोळ्यांवर स्प्रे मारून मोबाईल पळविणारा चोरट्यास सजग नागरिकांनी पकडले. त्याला शिवाजीनगर पोलिसांच्या स्वाधीन केले. त्याच्याविरूध्द जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार शहराच्या गोकुळनगर भागात घडला.

गोकुळनगर भागात संजय रामचंद्र आनेराव याची वेदांत नावाची मोबाईल शॉपी आहे. या शाॅपीवरून मोबाईल खरेदी करण्याच्या बहाण्याने मंगेश अप्पाराव कुटे रा. दिग्रस ता. पालम जिल्हा परभणी हा गेला. दुकानदाराला वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल दाखविण्यास सांगितले. अनेक मोबाईल दाखविल्यानंतर यापेक्षा जास्त किंमतीचा मोबाईल नाही का? असे म्हटल्याने दुकानदाराने सात हजार रुपये किंमतीचा मोबाईल दाखविताच मंगेश कुटे याने दुकानदार संजय आनेराव यांच्या डोळ्यात स्प्रे मारला. लगेच तो खाली बसला. यावेळी हा चोरटा मोबाईल घेऊन पळत सुटला. 

काही सजग नागरिकांनी पाठलाग करून पकडले. चांगलीच धुलाई करून पोलिसांच्या स्वाधीन केले. संजय आनेराव यांच्या फिर्यादीवरुन शिवाजीनगर पोलिस ठाण्यात मंगेश कुटेविरूद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस हवालदार बिसाडे करीत आहेत.

Web Title: Spray in the eye and theft mobile in Nanded