जालन्यातील शाळा, कनिष्ठ महाविद्यालय अनुदानासाठी पथकाची तपासणी 

सुहास सदाव्रते
Wednesday, 2 December 2020

शासन निर्णय (ता.१३ सप्टेंबर २०१९) अन्वये अनुदानास पात्र घोषित व अनुदान मंजूर केलेल्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा व तुकड्यांची तपासणीसाठी विशेष कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. विभागात ता. १ ते ४ डिसेंबर दरम्यान शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांची तपासणी पथक करीत आहे. 

जालना : औरंगाबाद विभागातील अनुदानास पात्र घोषित व अनुदान मंजूर केलेल्या शाळा व तुकड्यांची विशेष तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे. शाळांची परिपूर्ण माहितीसह बायोमेट्रिक, प्रयोगशाळेची तपासणी पथक करणार आहे. औरंगाबाद विभागातील शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांचे वर्ग, तुकड्यासह अनुदान टप्पा वाढ करण्यात येणार आहे. 

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

शासन निर्णय (ता.१३ सप्टेंबर २०१९) अन्वये अनुदानास पात्र घोषित व अनुदान मंजूर केलेल्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा व तुकड्यांची तपासणीसाठी विशेष कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. विभागात ता. १ ते ४ डिसेंबर दरम्यान शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांची तपासणी पथक करणार आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

पथकात शिक्षण विभागाचे सहसचिव इ. मु. काझी हे पथक प्रमुख आहेत.पथक तपासणी करताना शाळेची सरल प्रणालीवरील माहिती, बायोमेट्रिक हजेरी,शंभर टक्के विद्यार्थी आधार कार्ड,दहावी-बारावी निकाल, प्रयोगशाळा यासह आरक्षण धोरणाचे पालक केले आहे की, नाही याची तपासणी पथक करणार आहे.राज्यातील हजारो शिक्षकांचा सोळा वर्षांपासून अनुदानाचा प्रश्न सुटलेला नाही.मूल्यांकन पात्र शाळांना वीस टक्के अनुदान  टप्पा देण्यात आला होता.परंतु कनिष्ठ महाविद्यालय वर्ग व तुकड्यांना अद्यापही कुठलेच अनुदान नाही.

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

यामुळे अनेक वर्षांपासून काम करणारे शिक्षक हैराण झाले आहे.कनिष्ठ महाविद्यालयांना सतरा वर्षांपासून अजूनही अनुदान नाही,आणि आता अनुदान देण्यासाठी पुन्हा पथके कशासाठी असा सवाल करीत मूल्यांकन यापूर्वीच झाले त्याचे काय,असा प्रश्न कनिष्ठ महाविद्यालय विनाअनुदानित कृती समितीचे विभागीय अध्यक्ष दीपक कुलकर्णी यांनी उपस्थित केला आहे.विहित नमुन्यात माहिती भरताना सरल प्रणाली,बायोमेट्रिक आणि आधार कार्ड माहिती नेमकी कोणत्या वर्षाची द्यायची याचा संभ्रम असल्याचे मुख्याध्यापकांचे म्हणणे आहे.

जिल्ह्य़ात शाळा तुकड्यांची अनुदान टप्पा वाढ करणे, अनुदानास पात्र अशा शाळांची माहिती घेतली जात आहे. मुंबई येथील पथक जिल्ह्य़ात येणार आहे. - आशा गरुड 
शिक्षणाधिकारी, जालना

(Edited by Pratap Awachar)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Squad inspection for school and junior college grants Jalna news