राखीव दलाचे वीस जवान जखमी

हिंगोली - कळमनुरी ते पुसद मार्गावर हिंगोलीच्या राज्य राखीव दल गट क्रमांक बाराचे वाहन उलटून शनिवारी अपघात झाला.
हिंगोली - कळमनुरी ते पुसद मार्गावर हिंगोलीच्या राज्य राखीव दल गट क्रमांक बाराचे वाहन उलटून शनिवारी अपघात झाला.

हिंगोली - कळमनुरी ते पुसद मार्गावर हिंगोलीच्या राज्य राखीव दल गट क्रमांक बाराचे वाहन उलटून झालेल्या अपघातात वीस जवान जखमी झाले आहेत. शनिवारी (ता.२०) सकाळी आकरा वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला आहे.

येथील राज्य राखीव दलातील कंपनी गडचिरोली येथे बंदोबस्तासाठी पाठवली जाते. पाच महिन्यांपुर्वी गेलेल्या कंपनीला रिलीफ देण्यासाठी आज सकाळी आठ वाजता ‘बी’ कंपनीमधील १२० जवान बंदोबस्तासाठी निघाले होते. चार वाहनांमधून हे जवान गडचिरोलीकडे जात होते. कळमनुरी ते पुसद मार्गावर पुसद पासून पंधरा किलोमीटर अलीकडेच उतारावर एका वाहनाचे ब्रेक निकामी झाले. चालकाने उतारावर ब्रेक लावण्याचा प्रयत्न केला. मात्र ब्रेक लागत नसल्याने सर्वांनाच चांगलाच घाम फुटला. त्यातच समोर एक ट्रॅक्टर उभे होते. चालकाने गेअरवरच वाहनावर ताबा मिळविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यानंतर वाहन रस्त्याच्या खाली जाऊन उलटले. या अपघातात वाहनामधील तीस पैकी वीस जवान जखमी झाले आहेत. 

त्यामधे नऊ जवानांना मुक्कामार लागला आहे. तर आठ जवानांना किरकोळ दुखापत झाली आहे. तर चार जवान मात्र गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातात वाहनामध्ये अडकलेले जवान चालकाच्या समोरील काच फोडून बाहेर पडले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com