मोबाईल फोनवर बोलणाऱ्या एसटीचालकाची बदली

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 16 जून 2018

औरंगाबाद - बस चालविताना मोबाईल फोनवर बोलणे चालकाला चांगलेच महागात पडले. या प्रकरणाची एसटी महामंडळाने गंभीर दखल घेऊन चालकाची विभागाच्या बाहेर बदली केली आहे.

बस चालविताना चालकांनी मोबाईलवर बोलू नये, असे महामंडळाचे निर्देश आहेत. असे असतानाही एसटीचालक सर्रास मोबाईलवर बोलताना दिसतात.

गेवराई-पैठण या पैठण आगारातील चालक एसटी बस चालवीत असताना मोबाईलवर बोलत असल्याची तक्रार 13 एप्रिलला करण्यात आली होती. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यामुळे महामंडळाची बदनामी झाली. वारंवार सांगूनही चालक ऐकत नसल्याचे लक्षात आल्यानंतर महामंडळाने या चालकाची बदली थेट विभागाच्या बाहेर केली.

Web Title: ST driver transfer