लातूर: एसटी संप सुरूच आणि प्रवाशांचे हालही

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 9 जून 2018

पगारवाढीबाबत नाराजी व्यक्त करत एसटी कर्मचाऱ्यांनी हे आंदोलन सुरू केले आहे. अचानक काम बंद केल्याने प्रवाशांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागले. त्यामुळे काम बंद करणाऱ्या कर्मचाऱ्यांविरोधात एसटी प्रशासनाने कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.

लातूर : एसटी कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी (ता. 8) मध्यरात्रीपासून अचानक कामबंद आंदोलन सुरु केले. हे आंदोलन दुसऱ्या दिवशीही सुरुच आहे. त्यामुळे लातुरातील बस डेपोमधून गाड्याच बाहेर निघाल्या नाहीत. परिणामी, प्रवाशांना सलग दुसऱ्या दिवशी हाल सहन करावे लागत आहेत.

पगारवाढीबाबत नाराजी व्यक्त करत एसटी कर्मचाऱ्यांनी हे आंदोलन सुरू केले आहे. अचानक काम बंद केल्याने प्रवाशांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागले. त्यामुळे काम बंद करणाऱ्या कर्मचाऱ्यांविरोधात एसटी प्रशासनाने कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. लातुरातील 110 कर्मचाऱ्यांच्या नावांची यादी सध्या तयार आहे. त्यांच्यावर निलंबनाची टांगती तलवार आहे; मात्र, निलंबन झाले तरी संप सुरुच ठेऊ, असा इशारा एसटी कर्मचाऱ्यांनी दिला आहे.

दरम्यान, संपाच्या पहिल्या दिवशी जिल्ह्यातील 90 टक्के बस बंद होत्या, तर आज (ता. 9) 100 टक्के बस बंद आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.

Web Title: ST employee strike continue in Latur