औरंगाबाद - संपाच्या दुसऱ्या दिवशी एसटी सेवा संपूर्ण कोलमडली 

अनिलकुमार जमधड़े
शनिवार, 9 जून 2018

औरंगाबाद : एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी अघोषित संप पुकारला, त्यामुळे दुसर्‍या दिवशी जवळपास सर्व कर्मचारी संपात सहभागी झाले, मध्यवर्ती कार्यशाळे समोर कर्मचाऱ्यांनी जोरदार निदर्शने केली. 

औरंगाबाद : एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी अघोषित संप पुकारला, त्यामुळे दुसर्‍या दिवशी जवळपास सर्व कर्मचारी संपात सहभागी झाले, मध्यवर्ती कार्यशाळे समोर कर्मचाऱ्यांनी जोरदार निदर्शने केली. 

शनिवार (ता. 9) विभागातील पैठण वैजापूर सोयगाव सिल्लोड आगार पूर्णतः बंद होते. तर औरंगाबाद मध्यवर्ती बस स्थानकातून केवळ 18 फेऱ्या करण्यात आल्या. सिडको बस स्थानकातून 35 फेऱ्या करण्यात आल्या. तर गंगापूर चार आणि कन्नड आगारातून अवघी एक फेरी करण्यात आली. दुपारी बारा वाजेपर्यंत विभागातील सर्व आगरातून 757 फे ऱ्या होणे अपेक्षित असताना, केवळ 58 फेऱ्या होऊ शकल्या. कालच्या तुलनेत आज मोठ्या प्रमाणावर कर्मचारी संपात उतरले असल्याचे दिसून येत आहे. या संपामुळे प्रवाशांची तारांबळ होत असून, खाजगी प्रवासी वाहतूकदारांनी प्रचंड लूट सुरू केली आहे.

Web Title: st employees on strike in aurangabad on second day