हिंगोलीत एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे वाहतुक ठप्प

मंगेश शेवाळकर
शुक्रवार, 8 जून 2018

हिंगोली- एसटी कर्मचाऱ्यांना दिलेल्या तुटपुंजा पगार वाढीच्या निषेधार्थ कर्मचारी संघटनेने अचानक संप पुकारल्याने हिंगोली जिल्ह्यातील वाहतूक ठप्प झाली आहे.

हिंगोली- एसटी कर्मचाऱ्यांना दिलेल्या तुटपुंजा पगार वाढीच्या निषेधार्थ कर्मचारी संघटनेने अचानक संप पुकारल्याने हिंगोली जिल्ह्यातील वाहतूक ठप्प झाली आहे.

राज्याच्या परिवहन विभागाने एसटी कर्मचाऱ्यांसाठी केलेली पगारवाढीची घोषणा फसवी असल्याचा आरोप कर्मचारी संघटनांनी केला आहे. कृती समितीच्या मागणीनुसार वेतन वाढ झाली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. शासनाने मात्र सर्व कर्मचाऱ्यांना 32 ते 48 टक्के वेतनवाढ होणार असल्याचा दावा केला आहे. मात्र प्रत्यक्षात 17 ते 25 टक्केच वाढ मिळत आहे. त्यामुळे शासनाची वेतनवाढीची घोषणा फसवी असल्याचा आरोपही संघटनेने केला आहे. शासनाच्या चुकीच्या धोरणाच्या निषेधार्थ विविध संघटनांनी गुरुवारी तारीख 7 मध्यरात्री बारा पासून संप पुकारला आहे. 

त्यामुळे आज सकाळी हिंगोली आगारातून लांब पल्ल्याच्या बसेस रवाना झाल्या नाहीत. एसटी कर्मचारी सकाळ पासूनच कार्यालयात बसून होते. या संपामुळे प्रवाशांची मात्र मोठे हाल झाले आहेत. सकाळीच बाहेरगावी जाण्यासाठी आलेले प्रवासी एसटीच्या वाट पाहत बसले होते. मात्र एसटी कर्मचाऱ्यांचा संप असल्याची माहिती झाल्यानंतर अनेक प्रवाशांनी खासगी प्रवासी वाहतुकीचा आसरा घेतला. याबाबत आगा प्रमुख डी बी झरीकर यांनी हिंगोली आगारातून सकाळी केवळ एक बस रवाना झाल्याचे सांगितले. एसटी कर्मचाऱ्यां सोबत चर्चा सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या संपामुळे आगारातील सुमारे 57 पेक्षा अधिक बसेस जागेवरच उभ्या होत्या.

Web Title: ST employees strike in Hingoli