लातुरात बससेवा ठप्प

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 8 जून 2018

लातूर - एसटी कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन सुरू केले असल्याने लातुरातील एसटी बससेवा शुक्रवारी पहाटेपासून ठप्प झाली आहे; पण या आंदोलनामुळे प्रवाशांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचे दिसत आहे.

लातूर - एसटी कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन सुरू केले असल्याने लातुरातील एसटी बससेवा शुक्रवारी पहाटेपासून ठप्प झाली आहे; पण या आंदोलनामुळे प्रवाशांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचे दिसत आहे.

वेतनवाढी बाबत नाराजी व्यक्त करत महाराष्ट्र राज्य एस.टी. कामगार संघटना (संलग्न आयटक), महाराष्ट्र मोटार कामगार फेडरेशन, महाराष्ट्र एस.टी. वर्कर्स काँग्रेस (इंटक) या संघटनांतर्फे मध्यरात्री बारापासून संपाला सुरवात झाली आहे. यात महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे चालक, वाहक, मेकॅनिक उत्सफूर्तपणे सहभागी झाले आहेत. त्यामुळे विविध मार्गांवर धावणाऱ्या लातुरातील 90 टक्क्यांहून अधिक बस डेपोमध्ये उभ्या आहेत; पण प्रवासी बस स्थानकावर बसची वाट पाहत ताटकळत उभे आहेत. 

महामंडळाचे लातूर विभागप्रमुख सचिन क्षीरसागर म्हणाले, कुठलीही पूर्वकल्पना न देता हा संप सुरू आहे. त्यामुळे आम्ही कर्मचाऱ्यांना बस सेवा सुरू करण्यास सांगत आहोत. त्यासाठी पालक अधिकारी नेमले आहेत. ते जिल्ह्यातील प्रत्येक बस स्थानकांना भेटी देत आहेत. याचा नक्कीच सकारात्मक परिणाम होईल, असा विश्वास आहे."

Web Title: st employees strike state midnight