एसटीचीही यंदा दिवाळी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 नोव्हेंबर 2016

औरंगाबादची दहा दिवसांत ७९ लाखांची कमाई 

औरंगाबाद - राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या औरंगाबाद विभागाला यंदाची दिवाळी चांगलीच पावली. २७ ऑक्‍टोबर ते सहा नोव्हेंबरदरम्यान एसटीने ७९ लाखांची कमाई केली आहे. जादा गाड्या आणि प्रवाशांचा वाढलेल्या संख्येमुळे ही कमाई केली, अशी माहिती विभाग नियंत्रक आर. एन. पाटील यांनी सोमवारी (ता. सात) दिवाळी भेट कार्यक्रमात पत्रकारांना दिली. 

श्री. पाटील म्हणाले, की २७ ऑक्‍टोबर ते सहा नोव्हेंबरदरम्यान औरंगाबाद विभागात जादा बसगाड्या दोन लाख ६४ हजार ७६६ लाख किलोमीटर चालविण्यात आल्या. दहा ते वीस टक्‍के करण्यात आलेल्या दरवाढीचा एस.टी.ला गेल्या वर्षीप्रमाणे यंदा मोठा फायदा झाला आहे. औरंगाबाद विभागातील आठ आगारांमध्ये २७ ऑक्‍टोबरपासून ते सहा नोव्हेंबरदरम्यान पुणे, हिंगोली, हिंजेवाडी, धुळे, चाळीसगाव, अकोला, बुलडाणा, नागपूर, अमरावती, वाशीम, रिसोड, नांदेड, परभणी, लातूर, बीड, अकोला, जालना, सोलापूर, संगमनेर, शिर्डी, मालेगाव, नाशिक, भुसावळ, शहादा या ठिकाणी जादा बसगाड्या सोडण्यात आल्या होत्या. त्याचबरोबर प्रवाशांच्या थेट सोईकरिता नाशिक, जळगाव, धुळे या मार्गावर दर अर्ध्या तासाला विनावाहक बसगाड्या सोडण्यात आल्या. याच काळात प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी आगारांचे व बसस्थानकांचे सुशोभीकरणासाठी आकाशदिवे, विशेष विद्युतरोषणाई करण्यता आली होती. इतर आगारांतील मुक्‍कामी असलेल्या चालक व वाहकांसाठी सर्व आगारांत अभ्यंगस्नान व दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले, असेही आर. एन. पाटील यांनी सांगितले.

Web Title: st income in diwali season