एसटीची भाडेवाढ अटळ - दिवाकर रावते

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 27 मे 2018

औरंगाबाद - डिझेलची सतत दरवाढ होत असून, रोज भाववाढ होत असल्याने हिशेबाचे आकडे जुळविताना एसटी प्रशासनाची दमछाक होत आहे. त्यामुळे एसटीची भाडेवाढ केल्याशिवाय पर्याय नाही. जूनच्या पहिल्या आठवड्यात याबाबत निर्णय घेण्यात येणार येईल, अशी माहिती परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी शनिवारी दिली. 

येथील एसटी महामंडळाच्या विभाग नियंत्रक कार्यालयासमोर एसटी कर्मचाऱ्यांनी तयार केलेल्या बागेचे लोकार्पण रावते यांच्या हस्ते झाले. या वेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘‘सध्या डिझेलची सतत दरवाढ होत आहे. गेल्या तीन महिन्यांत डिझेल दरवाढीने एसटी महामंडळाला ४७० कोटी रुपयांचा अतिरिक्त फटका बसला. डिझेल दरवाढ आणि एसटी बसचे सध्याच्या तिकिटांचे दर याचा हिशेब जुळणे अवघड झाले आहे. आज पुन्हा ३५ पैशांनी डिझेल वाढले आहे. त्यामुळे आता तिकीट दरवाढ केल्याशिवाय एसटीला पर्याय नाही.’’

एसटीचा दोन हजार ३०० कोटी रुपयांचा संचित तोटा आहे. त्यातच कामगारांच्या वेतन कराराचा मोठा भार पडणार आहे. अशा परिस्थितीत तिकीट दरवाढ केल्याशिवाय एसटीला सध्या पर्याय नाही. 
- दिवाकर रावते, परिवहनमंत्री

Web Title: ST rent Increase Divakar Ravate