एसटीच्या ताफ्यात लवकरच 'सीटिंग कम स्लीपर कोच'

सकाळ वृत्तसेवा 
मंगळवार, 23 जुलै 2019

एसटी महामंडळाच्या ताफ्यातील "शिवशाही'मध्ये आणखी वाढ करण्याबरोबरच नव्याने "सीटिंग कम स्लीपर कोच' शिवशाही रस्त्यावर आणण्यात येत असल्याची माहिती एसटीचे व्यवस्थापकीय संचालक रणजितसिंह देओल यांनी सोमवारी (ता. 22) येथे दिली.

औरंगाबाद - एसटी महामंडळाच्या ताफ्यातील "शिवशाही'मध्ये आणखी वाढ करण्याबरोबरच नव्याने "सीटिंग कम स्लीपर कोच' शिवशाही रस्त्यावर आणण्यात येत असल्याची माहिती एसटीचे व्यवस्थापकीय संचालक रणजितसिंह देओल यांनी सोमवारी (ता. 22) येथे दिली.

नियमित आढावा बैठकीसाठी देओल येथे आले होते. बैठकीनंतर पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. ते म्हणाले, 'सध्या महामंडळाच्या ताफ्यात 900 शिवशाही बस आहेत. त्यामध्ये आणखी 800 शिवशाहीची वाढ करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे 200 "सीटिंग कम स्लीपर' अशा शिवशाही येत्या तीन महिन्यांत रस्त्यांवर दिसतील. हिरकणी, एशियाड बंद करून हळूहळू शिवशाही वाढविण्याचे प्रयत्न आहेत. नवीन 200 "विठाई' बसबांधणीला सुरवात करण्यात आली असून, प्रत्येक जिल्ह्यातून पंढरपूरला जाणारी ही बस असेल.''


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ST Shivshahi Seating Cum Slipper Coach

टॅग्स