...तर दिवाळीत एसटीचा पुन्हा संप

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 ऑगस्ट 2018

औरंगाबाद - एसटी कामगारांना ग्रेड-पे न मिळाल्यास दिवाळीमध्ये पुन्हा संप करण्याचा इशारा महाराष्ट्र एसटी वर्कर्स कॉंग्रेसतर्फे (इंटक) देण्यात आला. इंटकच्या भूमिकेमुळे पुन्हा प्रवाशांना संपाला सामोरे जावे लागण्याची शक्‍यता बळावली आहे. परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी एसटी कर्मचाऱ्यांसाठी ऐतिहासिक वेतनवाढ केल्याचा दावा केला; मात्र ही वेतनवाढ अत्यल्प असल्याने 8 व 9 जूनला एसटी कर्मचाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने संप पुकारला. संपातील सहभागींवरही कारवाई केली. त्यामुळे परिवहनमंत्र्यांनी फसवणूक केल्याची भावना एसटी कामगारांमध्ये निर्माण झाली आहे. म्हणूनच दिवाळीमध्ये पुन्हा संप करण्याचा निर्णय नाशिकच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती इंटकचे सरचिटणीस मुकेश तिगोटे यांनी दिली.
Web Title: St Strike in Diwali