वाहतूक शाखेचा खडा पहारा

file photo
file photo

परभणी : रस्त्यावरील गर्दी कमी करण्यासाठी शहर वाहतूक शाखा ठिकठिकाणी थांबून वाहने व नागरिकांची चौकशी करीत असून त्यामुळे रस्त्यावरील गर्दीला बऱ्यापैकी आळा बसला आहे.

परभणी शहर वाहतूक शाखेसह विविध पोलिस ठाण्यांचे पोलिस कर्मचारी शहरात ठराविक वेळेत गर्दी रोखण्याचे काम मोठ्या धाडसाने करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे. ‘कोरोना’ प्रतिबंधक उपाययोजनेंतर्गत नागरिकांचा एकमेकांशी होणारा संपर्क टाळण्यासाठी शहर वाहतूक शाखेने कंबर कसली आहे. सकाळपासून रात्रीपर्यंत शहर वाहतूक शाखेचे कर्मचारी गर्दीच्या ठिकाणी चौकाचौकांत थांबून रस्त्यावरून फिरणाऱ्या वाहनांना रोखून त्यातील नागरिक, दुचाकीधारक, पायी जाणाऱ्यांची कसून चौकशी करीत आहेत. विनाकारण फिरणाऱ्यांना तंबी देऊन फिरण्यास प्रतिबंध करण्याचा प्रयत्न करीत आहेत. शहर वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक गजेंद्र सरोदे यांच्यासह आरएसपीचे जिल्हा समादेशक सुशील देशमुख हेदेखील या उपाययोजनेमध्ये जिल्हा समादेशक सुशील देशमुख हेदेखील या हिरिरीने भाग घेऊन शहरातील रहदारी कमीत कमी कशी होईल, याची खबरदारी घेताना दिसून येत आहेत.


खबरदारी घेतलीच पाहिजे
शासनाने अत्यावश्यक सेवा सुरू ठेवल्या आहेत. अन्नधान्य, भाजीपाला आदी पदार्थांची आवक मुबलक प्रमाणात होत आहे. असे असतानाही लोक का गर्दी करतात हे समजून येत नाही. हा विषाणू आता आपल्या दारात येऊ नये म्हणून नये म्हणून प्रत्येकाने खबरदारी घेतलीच पाहिजे. त्यासाठी शहर वाहतूक शाखा प्रयत्नशील असल्याचे पोलिस निरीक्षक गजेंद्र सरोदे म्हणाले.

हेही वाचा ....

‘कोरोना’च्या माहितीपत्रकाचे विमोचन

सोनपेठ (जि.परभणी) : कोरोनाची माहिती सर्वसामान्य नागरिकांना समजावी यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने माहितीपत्रक व पुस्तकांचे विमोचन जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती निर्मला विटेकर यांच्या हस्ते शनिवारी (ता.२८) करण्यात आले. या वेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राजेश विटेकर, सोनपेठ नगर परिषदेचे गट नेते चंद्रकांत राठोड, तालुका आरोग्य अधिकारी सुभाष पवार, पोलिस निरीक्षक गजानन भातलवंडे, नगरसेवक श्रीकांत विटेकर, दतात्रय कदम, डॉ श्रीनिवास गुळभिले, सुनील बर्वे, अमृत स्वामी, जीलानी कुरेशी, युनुस शेख, नायब तहसीलदार साहेबराव घोडके, कल्पेश राठोड यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते. ही माहिती पुस्तिका व पत्रके गावोगाव नागरिकांना वाटण्यात येणार आहेत.

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com