‘स्थायी’ने फुगविले २५० कोटींनी अंदाजपत्रक

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 एप्रिल 2018

औरंगाबाद - उत्पन्नवाढीच्या नावाने ठणाणा असलेल्या महापालिकेचे गेल्या महिन्यात वर्ष २०१८-१९ चे मूळ प्रशासकीय अंदाजपत्रक १,२७५ कोटी रुपयांचे असताना त्यात स्थायी समितीने २०० कोटी ५० लाखांची वाढ केली.

यामुळे आता वार्षिक अंदाजपत्रकाचा आकडाही फुगला आहे. स्थायी समिती सभापती गजानन बारवाल यांनी रविवारी (ता. २९) १,४७६ कोटी ७२ हजार जमा व १,४७५ कोटी ८७ लाख खर्च असलेले १३ लाख ४२ हजार रुपये शिलकीचे वार्षिक अंदाजपत्रक विशेष सर्वसाधारण सभेपुढे सादर केले. 

सभापती बारवाल यांनी वार्षिक अंदाजपत्रक सादर करताना त्यात मालमत्ता करात ५० कोटी, स्थानिक संस्था करात ३० कोटी, शासकीय अनुदानात ४० कोटी, पाणीपट्टीत २५ कोटी; तर इतर वसुलीतून येणाऱ्या उत्पन्नात वाढ सुचवली. स्थायी समितीने प्रशासकीय अंदाजपत्रकात २०० कोटी ५० लाख रुपयांची वाढ सुचविली. महापौरांनी ते स्वीकारून अभ्यासासाठी नगरसेवकांना त्याच्या प्रती उपलब्ध करून देण्याचे आदेश प्रशासनाला दिले. तसेच अंदाजपत्रकाचा अभ्यास करून येत्या काही दिवसांत नगरसेवकांना त्यावर मत मांडण्यासाठी बजेटवर विशेष सभा बोलावली जाणार असल्याचे सांगून बैठक स्थगित केली. 

विशेष तरतूद 
स्थायी समिती सभापती बारवाल यांनी सर्वसाधारण सभेत वार्षिक अंदाजपत्रक सादर करताना त्यात क्रांती चौक येथील पुतळ्याची उंची वाढविणे, महाराणा प्रताप यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यासह प्रमुख १४ विकासकामांसाठी विशेष तरतूद सुचविली आहे. माँसाहेब मीनाताई ठाकरे कन्या सुरक्षा योजना, बाळासाहेब ठाकरे मोफत अंत्यविधी योजना, पडेगाव-मिटमिटा सफारी पार्क येथे प्राथमिक कामे, सिद्धार्थ उद्यानात नवीन प्राणी व पक्षी ठेवण्याचे पिंजरे, महानुभाव चौकात भव्य प्रवेशद्वार, महानुभाव आश्रम ते लिंकरोड सुशोभीकरण, गोमटेश मार्केट आरसीसी पूल, जीआयएम मॅपिंगद्वारे मालमत्ता सर्वेक्षण, घनकचरा व्यवस्थापनासाठी पावडर खरेदी, कंपोस्टिंग पीट व अग्निशमन यंत्रणेच्या बळकटीकरणासाठी बजेटमध्ये विशेष तरतूद केली आहे.

Web Title: standing committee 250 crore rupees budget