दहावी, बारावीची गुणपडताळणी करायची...मग करा ही प्रक्रीया...!

सुहास सदाव्रते
बुधवार, 15 जुलै 2020

राज्यात सध्या कोरोना विषाणू संसर्गजन्य घटनेमुळे अनेक जिल्हयात लॉकडाउन व संचारबंदी लागू आहे. येत्या काही दिवसात दहावी बारावीचे निकाल जाहीर होतील. निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना गुणपडताळणी, उत्तर पत्रिका छायाप्रत, पुनर्मूल्याकन, स्थलांतर प्रमाणपत्र आदीसह विविध प्रमाणपत्रासाठी विभागीय मंडळात जावे लागते. 

जालना : कोरोना विषाणू संसर्गजन्य घटनमूळे विद्यार्थी आरोग्य खबरदारी म्हणून राज्य मंडळाने ऑनलाइन कामकाज प्रक्रिया सुरू केली आहे. गुणपडताळणी, उत्तर पत्रिका छायाप्रत यासह विविध प्रमाणपत्रासाठी आता ऑनलाइन नोंदणी करावी लागणार आहे. 

घरातल्या घरात तपासणीकडे वाढला कल, आरोग्याबाबत लातूरकर जागरूक   

राज्यात सध्या कोरोना विषाणू संसर्गजन्य घटनेमुळे अनेक जिल्हयात लॉकडाउन व संचारबंदी लागू आहे. येत्या काही दिवसात दहावी बारावीचे निकाल जाहीर होतील. निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना गुणपडताळणी, उत्तर पत्रिका छायाप्रत, पुनर्मूल्याकन, स्थलांतर प्रमाणपत्र आदीसह विविध प्रमाणपत्रासाठी विभागीय मंडळात जावे लागते. 

पालकमंत्र्यांपासून अल्पभूधारक शेतकरी ठेवले चार हात दूर, कृषी विभागावर शेतकरी संतापले  
 

परंतु कोरोना विषाणू संसर्गजन्य परिस्थितीमुळे विद्यार्थी आरोग्याबाबत खबरदारी म्हणून राज्य मंडळाने हा निर्णय घेतला आहे. दहावी बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर मंडळाच्या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज भरावे लागतील. ऑनलाइन निकाल जाहीर झाल्यानंतर वीस दिवसात विद्यार्थ्यांना उत्तर पत्रिका छायाप्रत घेण्यासाठी अर्ज करता येईल. उत्तर पत्रिका छायाप्रतीसाठी प्रतीविषय चारशे रुपये शुल्क आहे. ऑनलाइन प्रक्रियेत डेबिट किंवा क्रेडिट कार्डने शुल्क भरावे लागणार आहे. 

धक्कादायक..! औरंगाबाद प्राणिसंग्रहालयात तब्बल पाच वाघांचा मृत्यू, वाचा सविस्तर..!

गुणपडताळणीच्या निकालाची वाट न पाहता संबंधित विद्यार्थ्यांनी पुढील परीक्षेस प्रविष्ट होण्यासाठी शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातूनच आवेदन पत्र भरावे. अशा सूचनाही मंडळाने दिल्या आहेत. गुणपडताळणीसाठी प्रती विषय पन्नास रुपये शुल्क आहे. तसेच पुनर्मूल्याकनासाठी प्रती विषय तीनशे रुपये शुल्क असून सहा विषयाचे विद्यार्थ्यांना पुनर्मूल्याकन करता येईल. गुणपडताळणी गुणात बदल झाल्यास संबंधित विद्यार्थ्यांना त्याच्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालयात कळविण्यात येणार असल्याचे मंडळाने म्हटले आहे. ऑनलाइन अर्जाची स्थिती विद्यार्थ्यांना संकेतस्थळावर पाहता येईल. याबाबतच्या सूचना राज्य मंडळाने विभागीय मंडळाना दिल्या आहेत.

सावंगीत कब्रस्तानाच्या कडेला आढळली शिवपिंड; गावकऱ्यांनी हा घेतला निर्णय..!  

विद्यार्थ्यांसाठी मंडळाने ऑनलाइन प्रक्रियाबाबत योग्य निर्णय घेतला आहे. यामुळे विद्यार्थ्यांना मंडळात जाण्याची गरज नाही. सगळी कामे ऑनलाइन होत आहे, हे चांगलेच आहे. 

प्रा. अरुण कुलकर्णी, अंकुशनगर, कारखाना 
 

(संपादन : प्रताप अवचार) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: State board has started online working process