मंत्रिमंडळ बैठकीसाठी प्रशासनाची लगीनघाई

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 सप्टेंबर 2016

औरंगाबाद - तब्बल आठ वर्षांनंतर मंत्रिमंडळाचे पाय ऐतिहासिक औरंगाबाद शहराला लागणार आहेत. तीन वर्षांनंतर मराठवाड्यात यंदा चांगला पाऊस झाला, सुखाचे दिवस आले अन्‌ मुख्यमंत्री औरंगाबादेत मंत्रिमंडळ घेऊन येण्यास तयार झाले आहेत. त्यामुळे शहरातील रस्ते, वाहतूक नियंत्रक दिव्यांची दुरुस्ती आणि देखभाल, विश्रामगृह आणि परिसराची स्वच्छता, वीजपुरवठा, बंदोबस्त आदींसह सर्व व्यवस्था चोख ठेवा, असा आदेश विभागीय आयुक्‍त डॉ. उमाकांत दांगट यांनी बुधवारी दिला. 

राज्य मंत्रिमंडळ बैठकीचे वेध प्रशासनाला लागले आहेत. 4 ऑक्‍टोबरला ही बैठक होण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. या पार्श्‍वभूमीवर दांगट यांनी बुधवारी विविध विभागांच्या प्रमुखांची पूर्वतयारीची बैठक घेतली. मंत्रिमंडळ बैठक विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात होईल. तेथील आसन व्यवस्था, बैठकीनिमित्त शहरात येणारे मंत्री व अधिकाऱ्यांची निवास व्यवस्था, परिवहन व्यवस्था, सुरक्षा व्यवस्था आदींबाबत चर्चा झाली. शनिवारी (ता.1) पुन्हा बैठक घेऊन कामांचा आढावा घेतला जाणार आहे. 

Web Title: state Cabinet meeting