कर्करोग संस्था २०२१ मध्येच

Caner-Organisation
Caner-Organisation

औरंगाबाद - राज्य कर्करोग संस्थेच्या प्रशासकीय मान्यतेनंतर सहा महिन्यांनी केंद्राची अंगीकृत ‘एचएससीसी’ ही कंपनी नियुक्त झाली. अंतिम प्रकल्प अहवाल आपणच बनविणार हे या कंपनीने स्पष्ट केले. त्यातून राज्य शासनाचे पितळ उघडे पडले; तर आडकाठी न आल्यास प्रकल्प पूर्ण होण्यास २०२१ वर्ष उजाडणार आहे. 

कर्करोग रुग्णालयाने राज्य कर्करोग रुग्णालयाचे ढोबळ अंदाजपत्रक १० ऑक्‍टोबर २०१७ ला ‘डीएमईआर’ला सादर केले. त्यानंतर डीएमईआरने प्रस्तावासह २५ ऑक्‍टोबर २०१७ ला वैद्यकीय शिक्षण मंत्रालयात समर्थन सादर केले; मात्र डिझाइन आणि त्यातील असंख्य त्रुटी, त्याच्या सुधारणा हा नेहमीचाच लालफितीचा अडसर लावल्याने केंद्रीय मंत्र्यांनी भूमिपूजन केल्यावरही प्रशासकीय मान्यता द्यायला राज्य शासनाला सहा महिने लागले. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वास्तुशास्त्रज्ञांनी बनविलेले डिझाइन हे प्राथमिक असून, केंद्राच्या रुग्णालयांच्या निकषांनुसार ही संख्या कमी होऊ शकते, असे सूचक वक्तव्य ‘एचएससीसी’चे जैनेश चहल यांनी केले. नियुक्त केलेली कंपनीच फायनल डीपीआर बनविणार, असे स्पष्ट असताना ही दिरंगाई का, असा सवालही याअनुषंगाने उपस्थित होत आहे. 

मार्चमध्ये कार्यादेश
बांधकामाचे कंत्राट मिळालेली एचएससीसी कंपनी डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात हॉस्पिटल्सच्या नॉर्म्सनुसार प्रेझेंटेशन करेल. त्यानंतर जानेवारी २०१९ च्या पहिल्या आठवड्यात डीपीआर सादर होईल. नंतर बांधकामासाठी निविदा मागविण्यात येईल. या प्रक्रियेच्या पूर्ततेनंतर ठेकेदार निश्‍चित होऊन मार्च २०१९ च्या पहिल्या आठवड्यात कार्यादेश मिळेल. त्यानंतर १८ महिने ते दोन वर्षांत बांधकाम पूर्ण करण्यात येईल. दरम्यान, कर्करोग रुग्णालयाने सादर केलेल्या मनुष्यबळाला मान्यता मिळेल. सध्या सचिव स्तरावरील मान्यता मिळाली असून, हायपॉवर कमिटीच्या निर्णयानंतर या पदांना मान्यता मिळेल, असे डॉ. कैलास शर्मा म्हणाले. 

असा आहे प्रकल्प 
 केंद्र व राज्य शासनाचा ९६.७० कोटींचा हा प्रकल्प 
 लिनॅक यंत्र व बंकरचा टर्न की प्रोजेक्‍ट २५ कोटींचा 
 जून २०१७ मध्ये केंद्राकडून यंत्रसामग्रीसाठी मिळाले ३१.३३ कोटी
 केंद्राकडून दुसऱ्या टप्प्यात बांधकामासाठी १२.१८ कोटी
 राज्याच्या हिश्‍श्‍यातून मिळाले साडेबारा कोटी
 ११ फेब्रुवारीला झाले भूमिपूजन 
 ३१.०७ कोटींच्या बांधकामाला मे २०१८ मध्ये मान्यता
 खाटांची क्षमता १६५ ने वाढणार
 सध्याच्या इमारतीवर एक मजल्याचे बांधकाम 
 लिनॅक खरेदी, बंकर व त्यावर दोन मजले
 मार्च २०१९ मध्ये होईल ठेकेदार निवड

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com