भूविकास बॅंकांवरील अडचणींचे ढग गडद 

शेखलाल शेख - सकाळ वृत्तसेवा 
शनिवार, 19 नोव्हेंबर 2016

औरंगाबाद - जुन्या हजार, पाचशे रुपयांच्या नोटाबंदीची कुऱ्हाड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकांवर पडलेली असताना राज्यातील 29 जिल्हा भूविकास बॅंकांवरील संकटांचे ढग आणखी गडद झाले आहेत. 24 जुलै 2015 रोजी राज्य सरकारने भूविकास बॅंका बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आता कर्मचाऱ्यांचे पगार, निवृत्तिवेतन, इतर हिशेब करण्यासाठी 22 जिल्ह्यांतील भूविकास बॅंकांच्या 44 मालमत्ता विक्रीस काढण्याच्या निर्णयाला नोटाबंदीच्या निर्णयाचे ग्रहण लागण्याची शक्‍यता आहे. 

औरंगाबाद - जुन्या हजार, पाचशे रुपयांच्या नोटाबंदीची कुऱ्हाड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकांवर पडलेली असताना राज्यातील 29 जिल्हा भूविकास बॅंकांवरील संकटांचे ढग आणखी गडद झाले आहेत. 24 जुलै 2015 रोजी राज्य सरकारने भूविकास बॅंका बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आता कर्मचाऱ्यांचे पगार, निवृत्तिवेतन, इतर हिशेब करण्यासाठी 22 जिल्ह्यांतील भूविकास बॅंकांच्या 44 मालमत्ता विक्रीस काढण्याच्या निर्णयाला नोटाबंदीच्या निर्णयाचे ग्रहण लागण्याची शक्‍यता आहे. 

आधीच भूविकास बॅंकांमधील कर्मचाऱ्यांना दीड वर्षापासून तर विदर्भातील कर्मचाऱ्यांना तीन वर्षे 8 महिन्यांपासून पगार मिळालेला नाही. राज्यातील 29 जिल्हा सहकारी कृषी ग्रामीण बहुद्देशीय विकास बॅंक म्हणजेच भूविकास बॅंकांतील कर्मचाऱ्यांना 15 महिन्यांपासून पगार मिळालेला नाही. बॅंकांवर अवसायक बसविल्याने कर्मचाऱ्यांना आता परवानगीशिवाय एक रुपयाही खर्च करता येत नाही, दुसरीकडे वसुली नावालाच आहे. या वर्षी फक्त दिवाळीत कर्मचाऱ्यांना आठ ते दहा हजार रुपये आगाऊ देण्यात आले होते. तेही पुन्हा पगारातून कपात केले जाणार आहेत. हा सर्व खेळ सुरू असताना नोटाबंदीने संकटाचे ढग गडद झाले आहेत. 

राज्यातील भागभांडवल 

44 कोटी 41 लाखांचे या बॅंकांचे राज्यातील भागभांडवल हे 44 कोटी 41 लाखांचे आहे. या बॅंकांचे राज्यातून तब्बल एक हजार 65.35 कोटी रुपयांचे कर्ज येणे आहे. मात्र, त्याची वसुली आता शक्‍य नाही. शिखर बॅंकेने या जिल्हा बॅंकांमध्ये 30 कोटी 38 लाखांची गुंतवणूक केलेली आहे. भूविकास बॅंकांकडे इमारती, जमीन, फर्निचर, वाहन, यंत्रसामग्री, मालकी हक्काचे कोट्यवधी रुपयांचे गाळे आता नावालाच शिल्लक आहेत. राज्यात जवळपास सर्वच शाखा अवसायनात काढून त्यावर अवसायक नेमण्यात आले. राज्यात 22 जिल्ह्यांतील 44 मालमत्ता विक्री करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, नोटाबंदीमुळे या मालमत्तांना खरेदीदार मिळणार का, हा प्रश्‍नच आहे. 

शिखर बॅंकेची जिल्हा बॅंकांकडील थकबाकी (सर्व रक्कम लाखांत) 

जिल्हा बॅंक............................रक्कम येणे बाकी 

नाशिक....................................7369.04 

धुळे.......................................14445.14 

जळगाव..................................8551.38 

ठाणे.......................................4119.38 

पुणे........................................9948.87 

नगर................................7714.75 

सोलापूर..................................5865.23 

रायगड....................................2315.51 

कोल्हापूर.................................13929.66 

सातारा....................................10392.20 

सांगली...................................15067.20 

रत्नागिरी..................................3453.52 

सिंधुदुर्ग...................................2207.52 

अमरावती..................................6748.76 

अकोला.....................................3664.80 

बुलडाणा....................................4515.12 

यवतमाळ..................................5674.63 

नागपूर.......................................8853.66 

वर्धा........................................3661.19 

भंडारा.......................................4411.07 

चंद्रपूर........................................4144.70 

गडचिरोली..................................2343.04 

औरंगाबाद..................................11237.85 

जालना.......................................5652.13 

बीड..........................................8714.05 

नांदेड........................................10333.13 

परभणी......................................10575.53 

उदगीर.....................................4181.00 

उस्मानाबाद................................6283.07 

Web Title: The state government has taken the decision to close bhuvikas bank