मराठा समाजाच्या समन्वयकांची राज्यस्तरीय बैठक; २९ जूनला आंदोलन

जगदीश कुलकर्णी
बुधवार, 20 जून 2018

तुळजापूर : मराठा समाजासाठीचे आरक्षण, ॲट्रॉसिटी कायद्यात दुरूस्ती करावी यासह समाजाच्या विविध मागण्यांकडे सरकारने दुर्लक्ष केल्यामुळे सकल मराठा समाजाच्या वतीने २९ जून रोजी तुळजापूर येथील तुळजाभवानी मातेच्या महाद्वारासमोर जागरण गोंधळ करून आंदोलनाला सुरवात करण्याचा निर्धार समन्वयकांच्या राज्यस्तरीय बैठकीत करण्यात आला.  

तुळजापूर : मराठा समाजासाठीचे आरक्षण, ॲट्रॉसिटी कायद्यात दुरूस्ती करावी यासह समाजाच्या विविध मागण्यांकडे सरकारने दुर्लक्ष केल्यामुळे सकल मराठा समाजाच्या वतीने २९ जून रोजी तुळजापूर येथील तुळजाभवानी मातेच्या महाद्वारासमोर जागरण गोंधळ करून आंदोलनाला सुरवात करण्याचा निर्धार समन्वयकांच्या राज्यस्तरीय बैठकीत करण्यात आला.  

येथील तुळजाभवानी पुजारी मंडळाच्या सभागृहात बुधवारी (ता. २०) सकल मराठा समाजाच्या समन्वयकांची राज्यस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी आबासाहेब पाटील, रमेश केरे पाटील, विजया भोसले, वसंतराव पाटील, किशोर पवार, अशोक मगर, सुनील नागणे, जगदीश पाटील, सतीश खोपडे, अर्जुन साळुंखे, नितीन पवार, प्रतिक रोचकरी, जीवन इंगळे, सज्जन जाधव, श्रीमंत कोकाटे, सज्जनराव साळुंके, विष्णू इंगळे, जगदीश पलंगे, आलोक शिंदे, रामभाऊ गायकवाड, विजय पवार, देवीदास पाटील, धनंजय देशमुख, भैय्या पाटील, प्रदीप मुंडे, अॅड. अनिल काळे यांच्यासह राज्यभरातून आलेले समन्वयक उपस्थित होते. 

या बैठकीनंतर माहिती देताना किशोर पवार म्हणाले की, २९ जून रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून तुळजाभवानी मातेच्या महाद्वारासमोर जागरण गोंधळ करण्यात येणार आहे. मोर्चा काढून जाहीर सभा होणार आहे. 

मराठा समाजासाठी आरक्षण, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ, ॲट्रॉसिटी कायद्यात दुरूस्ती करणे यासाठी समाजाच्या वतीने राज्यभरात ५८ मोर्चे काढण्यात आले. मात्र समाजाच्या मागण्यांकडे सरकारने दुर्लक्ष केले. त्यामुळे या सरकारला जागे करण्यासाठी आता गनिमी कावा पद्धतीने आक्रमक मोर्चे काढण्याचा ठराव बैठकीत सर्वानुमते मंजूर करण्यात आला. राज्यभर असे मोर्चे काढण्यासाठी आखणीही केली जाणार आहे. आंदोलनाची सुरवात तुळजापुरातून करण्यात येणार आहे. २९ जून रोजी तुळजाभवानी मातेच्या महाद्वारासमोर जागरण गोंधळ घालून आंदोलनास सुरवात करण्यात येणार आहे.

Web Title: State level meeting of coordinators of Maratha community; Movement on 29th june