छत्तीसगड निवडणुकीत हिंगोलीच्‍या राखीव दलाला पाचारण

SRPF
SRPF

हिंगोली : छत्तीसगड राज्‍यात होत असलेल्‍या निवडणुकीमध्ये कायदा व सुव्यवस्‍था सांभाळण्याची जबाबदारी हिंगोलीच्‍या राज्‍य राखीव दलावर सोपवण्यात आली आहे. त्‍यानुसार राखीव दलातील एक कंपनीमध्ये छत्तीसगड येथे तैनात करण्यात आली आहे.

हिंगोली येथील राज्‍य राखीव दल शिस्‍त व कर्तव्याच्‍या बाबतीत अग्रेसर मानले जाते. त्‍यामुळेच राखीव दलाच्‍या कंपन्या गडचिरोली, मुंबई, नांदेड येथे बंदोबस्‍तासाठी पाठवल्‍या जातात. महत्‍वाच्‍या व्यक्‍तींच्‍या बंदोबस्‍ताच्‍या वेळी हिंगोलीच्‍या राखीव दलाला प्राधान्य दिले जाते. त्‍यानुसार मागील काही वर्षात हिंगोलीच्‍या राखीव दलाने महाराष्ट्रासह बाहेर राज्‍यात कायदा व सुव्यवस्‍थेचा बंदोबस्‍त हाताळला आहे.

दरम्‍यान आता  छत्तीसगड राज्‍यामध्ये निवडणुका होत आहेत. या निवडणुकीमध्ये स्‍थानिक पोलिस व इतर पोलिस दलासह हिंगोलीच्‍या राज्‍य राखीव दलाला पाचारण करण्यात आले आहे. हिंगोली येथील राज्‍य राखीव दलाची शंभर जवानांची एक कंपनी निवडणूक बंदोबस्‍तासाठी बोलावण्यात आली आहे. त्‍यानुसार हिंगोली येथून काही दिवसापूर्वी राखीव दलाची कंपनी रवाना झाली आहे. छत्तीसगड राज्‍यातील निवडणुकांसह मतमोजणीनंतरच ही कंपनी हिंगोली येथे परतणार असल्‍याचे सांगण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com