जुन्या नोटा रद्दचा एसटीलाही फटका

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 नोव्हेंबर 2016

औरंगाबाद - केंद्र सरकारने चलनातून रद्द केलेल्या पाचशे, एक हजाराच्या जुन्या नोटांमुळे एसटीच्या प्रवाशांत मोठी घट झाली आहे. साधारणपणे कुठल्याही प्रवासासाठी सर्वसामान्य व्यक्ती एसटीला पसंती देतो. मात्र, नोटा रद्दच्या घाईगडबडीत अनेकांनी प्रवास लांबणीवर टाकल्याचे तसेच काहींनी प्रवास रद्द केल्याचे चित्र आहे.

एसटीकडून पाचशे, एक हजार रुपयांच्या जुन्या नोटा स्वीकारणे सुरू असले तरी एसटीच्या औरंगाबाद विभागाचा दररोज तब्बल दीड ते दोन लाखांचा तोटा होत आहे. निर्णयानंतर वेळ नोटा बदलून घेण्यातच जात आहे. त्यामुळे तातडीच्या प्रवासाशिवाय कोणी प्रवास करताना दिसत नाही. नोटा रद्दच्या निर्णयानंतर एसटीबरोबरच अर्थव्यवस्थेवर सर्वांगांनी परिणाम दिसत आहे. तसेच एसटीच्या प्रवाशांची संख्याही एकदम घटली आहे. अत्यावश्‍यक प्रवासी सेवा म्हणून एसटीकडून पाचशे व हजार रुपयांच्या जुन्या नोटा स्वीकारत आहे. मात्र, प्रथम प्राधान्य नागरिक बॅंकांना व एटीएमला देत असल्याने अनेकांनी प्रवास लांबणीवर टाकला आहे. तर अनेक प्रवाशांनी त्यांचा नियोजित प्रवासच रद्द केल्याने एसटीच्या बसने प्रवास करणाऱ्यांची संख्या घटली आहे.

Web Title: state transport affected