महिलांच्या तक्रारी सोडविण्यासाठी राज्य महिला आयोग आपल्या दारी!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 जून 2019

महिलांना त्यांच्या जिल्ह्याच्या ठिकाणी न्याय मिळावा यासाठी 'महिला आयोग आपल्या दारी' हा उपक्रम राज्यमहिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांच्या पुढाकाराने राबविण्यात येत आहे.

औरंगाबाद : महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी राज्य महिला आयोगातर्फे महिला आयोग आपल्या दारी हा उपक्रम घेतला आहे. मंगळवारी (ता.11) जिल्ह्यात हा उपक्रम राबवण्यिात येणार आहे. यात जिल्ह्यातील महिलांच्या तक्रारींची जनसुनावणी केली जाणार आहे. अशी माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी 'सकाळ'दिली. 

सुभेदारी विश्रामगृहावर सकाळी 10 वाजता होणार आहे. रहाटकर यांच्या उपस्थितीत तक्रारीची सुनावणी होणार आहे. महिलांना त्यांच्या जिल्ह्याच्या ठिकाणी न्याय मिळावा यासाठी 'महिला आयोग आपल्या दारी' हा उपक्रम राज्यमहिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांच्या पुढाकाराने राबविण्यात येत आहे. यामध्ये विभागस्तरावर महिलांच्या तक्रारीचे निवारण करण्यात येणार आहे. या जनसुनावणी प्रसंगी पोलीस, प्रशासन, विधीसल्लागार, समुपदेशक, जिल्हा समन्वयक सहभागी असणार आहे. ग्रामीण भागातील महिलांना मुंबई कार्यालयात येऊन तक्रार करणे, सुनावणीसाठी प्रत्यक्ष उपस्थित राहणं आर्थिकदृष्ट्या तसंच इतर कारणामुळे शक्‍य होत नाही. त्यांना याउपक्रमाचा फायदा होणार आहे. महिला आयोग आपल्या दारीअंतर्गतसुनावणी दरम्यान नव्या तक्रारींवर त्याच ठिकाणी कार्यवाही करण्यात येते. त्यामुळे आपली कैफियत मांडणाऱ्या महिलांना यातून न्याय मिळणार आहे. 

समुपदेश केंद्राबाबात आढावा बैठक -
जिल्ह्यातील नोंदणीकृत तसेच जिल्हा परिषदेमार्फत सुरु असलेल्या समुपदेशन केंद्रांची सद्यस्थिती, कामाच्या ठिकाणी महिलांच्या होणाऱ्या लैंगिक छळ रोखण्यासाठी कार्यरत अंतर्गत तक्रार निवारण समिती तसेच जिल्ह्यातील महिलांच्या तक्रारी आदींच्या कामकाजाची आढावा बैठक घेण्यात येणार आहे.या बैठकीस जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, उपजिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक, पोलीस आयुक्त, महानगरपालिका आयुक्त या वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: State Women Commission will provide a service to resolve complaints of women