साक्षी चितलांगेला राज्य युवा क्रीडा पुरस्कार 

साक्षी चितलांगे
साक्षी चितलांगे

औरंगाबाद - मुंबईच्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे औरंगाबादची आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू साक्षी चितलांगेला यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा क्रीडा पुरस्कार जाहीर झाला आहे. 

आंतरराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय पातळीवर बुद्धिबळ खेळात उत्कृष्ट कामगिरीबद्दल तिचा हा सन्मान करण्यात आला. नंदुरबार येथील धावपटू किसन तडवीचीही या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.

प्रतिष्ठानच्या कार्याध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते साक्षीला 21 हजार रुपये व प्रमाणपत्र पुण्यात देण्यात येईल. एअरपोर्ट ऍथॉरिटी ऑफ इंडियाकडून साक्षीला वर्षातील सर्वोत्तम खेळाडू हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. आतापर्यंत साक्षीने आंतरराष्ट्रीय पातळीवर दोन सुवर्णपदके, चार रौप्यपदके, दोन ब्रॉंझपदके अशी आठ पदके जिंकली आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com