"त्या' वतक्‍यावरून धनंजय मुंडे विरोधात महीला आयोग करणार कारवाई- विजया रहाटकर

प्रकाश बनकर
रविवार, 20 ऑक्टोबर 2019

धनंजय मुंडे यांनी विडा येथे झालेल्या प्रचार सभेत पंकजा मुंडे यांच्या विरुद्ध बोलतांना अतिशय खालच्या पातळीवर जाऊन गलिच्छ व बिभत्स भाषेत टीका केली होती, टिकेचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर धनंजय मुंडे विरोधात पंकजा मुंडे समर्थक, वंजारी समाज आणि सर्व सामान्य नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली. 

औरंगाबाद: भाजपा महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्यावर गलिच्छ व बिभत्स भाषेत टीका करणाऱ्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या धनंजय मुंडे यांच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात रात्री गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान धनंजय मुंडे यांच्यावर कारवाईसाठी राज्य महिला आयोगानेही सुमोटो दखल घेतली असून त्यांच्यावर करवाई करणार असल्याची माहिती आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी सांगितले. 

धनंजय मुंडे यांनी विडा येथे झालेल्या प्रचार सभेत पंकजा मुंडे यांच्या विरुद्ध बोलतांना अतिशय खालच्या पातळीवर जाऊन गलिच्छ व बिभत्स भाषेत टीका केली होती, टिकेचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर धनंजय मुंडे विरोधात पंकजा मुंडे समर्थक, वंजारी समाज आणि सर्व सामान्य नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली. 

दरम्यान या प्रकरणी राज्य महिला आयोगाने स्वत:हून याची दखल घेतली आहे. रहाटकर म्हणाल्या धनंजय मुंडे यांनी केलेले वक्‍तव्य अशोभनीय आहे. महिलांना लज्जा उत्पन्न होईल असे हे वक्‍तव्य असल्याचे मत आयोगांच्या सुकृत दर्शनी दर्शनी दिसून आले. पंकजा मुंडे या मंत्री आहे. एक जबाबादार लोकप्रतिनिधी आहेत. त्यांच्याबाबतीत असे बालेण हे अशोभनीय आहे. या वक्‍तव्याची राज्य महिला आयोगाने स्वत: हून सुमोटो दखल घेतली आहे. महिला आयोग धनंजय मुंडे यांच्यावर कारवाई करेले. असेही रहाटकर यांनी सांगितले. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: On that statement, the Commission will take action against Dhananjay Munde-Vijaya Rahatkar