सूक्ष्म सिंचनात राज्याचा पुढाकार महत्त्वाचा - यू. पी. सिंग

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 19 जानेवारी 2019

औरंगाबाद - राज्यात ठिबक आणि तुषार सिंचन वाढविण्याच्या कामासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत आहे. मात्र त्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेणे आवश्‍यक असल्याचे मत केंद्रीय पाणीपुरवठा, नदी विकास, गंगा पुनरुज्जीवन मंत्रालयाचे सहसचिव यू. पी. सिंग यांनी व्यक्त केले.

औरंगाबाद - राज्यात ठिबक आणि तुषार सिंचन वाढविण्याच्या कामासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत आहे. मात्र त्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेणे आवश्‍यक असल्याचे मत केंद्रीय पाणीपुरवठा, नदी विकास, गंगा पुनरुज्जीवन मंत्रालयाचे सहसचिव यू. पी. सिंग यांनी व्यक्त केले.

जागतिक सूक्ष्म सिंचन परिषदेचा समारोप शुक्रवारी झाला. पत्रकार परिषदेत सिंग यांनी केंद्र शासनाची भूमिका स्पष्ट केली. देशात आणि राज्यात ठिबक आणि तुषार सिंचन वाढवण्यातील आव्हाने निर्माण झालेली आहेत. भारतात पाऊस कमी पडतो असे नव्हे, तर पडलेला पाऊस साठवून ठेवण्याचे खरे आव्हान आहे. कमी पाण्यातील शेती कशी करावी यासाठी केंद्र सरकारतर्फे विविध स्तरांवर काम करण्यात येत आहे. तीनदिवसीय जागतिक परिषदेत सूक्ष्म सिंचनावर मंथन झाले.

विविध देशांतील सूक्ष्म सिंचनात काम करणाऱ्या कंपन्यांचे प्रतिनिधी, शासनाचे प्रतिनिधी यामध्ये सहभागी झाले होते. प्रत्येकाने आपल्या देशातील सूक्ष्म सिंचनातील योजना आणि कामाची माहिती दिली. ठिबक आणि तुषार सिंचन क्षेत्र हळूहळू वाढत आहे. त्यात अनेक कंपन्या पुढे येत आहेत. सूक्ष्म सिंचन उपकरणांच्या देखभालीचेही शेतकऱ्यांना प्रशिक्षण मिळाले पाहिजे. शंभर टक्के शेती सूक्ष्म सिंचनाखाली कशी आणता येईल, यासाठी प्रयत्न केला जात आहे. अधिक पाणी लागणारा ऊसही यापुढे सूक्ष्म सिंचनात आणण्यासाठी प्रयत्न आहे. अनेक योजना निधीअभावी अपूर्ण आहेत. अशा योजना पूर्ण करण्यासाठी केंद्र शासन प्रयत्नशील आहे. यात राज्य सरकारचा पुढाकार आवश्‍यक असल्याचे सिंग यांनी सांगितले.

Web Title: The states initiatives in micro irrigation are important U P Singh