परभणी जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक लसीचा साठा मंगळवार पर्यत येणार

Stocks of corona vaccine will arrive in Parbhani district till Tuesday
Stocks of corona vaccine will arrive in Parbhani district till Tuesday

परभणी : कोरोनावरील प्रभावी ठरणार्‍या व्हॅक्सीनचा (लस) साठा पुढील दोन दिवसात जिल्ह्यास प्राप्त होईल, अशी माहिती जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिली आहे. त्यामुळे नागरीकांना काळजी करू नये असे आवाहन ही त्यांनी केले आहे.

कोरोना विषाणूच्या प्रादूर्भावाने संपूर्ण जिल्ह्यात चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. दुसरीकडे लसीचा साठा संपुष्टात आला आहे. त्यामुळेच मोठी चिंता व्यक्त होत आहे. लसीचा साठा लवकर प्राप्त व्हावा, लसीकरण पुन्हा सुरु व्हावे, या दृष्टीने जिल्हा प्रशासन युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. लसीच्या साठ्याची मागणी नोंदवण्यात आली. त्या पाठोपाठ आरोग्य विभागाच्या संचालकांबरोबर जिल्हाधिकारी श्री. मुगळीकर यांनी संवाद साधला.

स्थिती निदर्शनास आणूण दिली. जिल्ह्यास आवश्यक तेवढी लस निश्चित पूरवावी, अशी आशाही जिल्हाधिकारी श्री. मुगळीकर यांनी व्यक्त केली. दरम्यान, शनिवारी दिवसभर लसीकरण व्यवस्थित झाले. प्राप्त झालेली लस संपुष्टात आली. त्यामुळे लसीकरणात व्यत्यय आला आहे. आपण साठ्याबाबत मागणी केलेली आहे. त्यासाठी पाठपुरावाही सुरू केला आहे. तो साठा मंगळवारपर्यंत प्राप्त होईल. साठा मोठ्या प्रमाणात प्राप्त होईल, असेही ते म्हणाले. यापूर्वी जिल्ह्याकरिता एक लाख चार हजार डोस प्राप्त झाले होते. त्यात 76 हजार कोविशील्ड व 28 हजार कोव्हॅक्सीनच्या लसीचा समावेश होता.

रेमडेसिव्हिर इंजेक्शनचे सक्रीय रुग्णसंख्येनिहाय होणार वाटप

राज्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त अभिमन्यू काळे यांनी सर्व जिल्हा प्रशासनास शनिवारी (ता. दहा) पाठवलेल्या एका पत्राव्दारे रेमडेसिव्हिर इंजेक्शनचे वाटप करताना रुग्णालयातील रुग्णांची संख्या विचारात घेऊन सूत्र निश्चितच करण्याबाबत काही निर्देश दिले आहेत. विशेषतः सक्रीय रुग्ण संख्या (अ‍ॅक्टिव्ह केसेस) वाढीचा दहा टक्के दर विचारात घेऊन जिल्हा निहाय औषधांचे वितरण करावे, उपलब्ध झालेल्या रेमडेसिव्हिरचा दहा टक्के साठा आपत्कालीन साठा म्हणून जिल्हाधिकार्‍यानी स्वतःच्या आख्त्यारीत ठेवावा. आपल्या जिल्ह्यातील रेमडेसिव्हिर इंजेक्शन वितरकांनी सक्रीय रुग्ण वाढ संख्या विचारात घेऊन संबंधित कंपनीकडे मागणी नोंद करण्याच्या सूचना द्याव्यात, येणार्‍या काळात दर आठवड्यात याचा आढावा घ्यावा, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत.

आरटीपीसीआर चाचण्यासाठी अद्यावत मशीन येणार

कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर आरटीपीसीआर चाचण्यांचे रिपोर्ट्स अवघ्या काही तासात उपलब्ध व्हावेत, यादृष्टीने जिल्हा प्रशासनाने केलेल्या प्रयत्नांमुळे जिल्हा शासकीय रुग्णालयाअंतर्गत प्रयोगशाळेस पुढील आठवड्यात नवीन मशीन उपलब्ध होणार आहे. मशीन उपलब्ध होताच रुग्णालयाअंतर्गत आरटीपीसीआर चाचण्यांच्या तपासणीची क्षमता दररोज चार हजारापर्यंत जाईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com