नांदेड : रस्ता अडवून गंभीर मारहाण करून जबरी चोरी

Stolen by beating incident happened at nanded
Stolen by beating incident happened at nanded

नांदेड : जुन्या वादातून रस्ता अडवून दोघांना लाकडांनी, लोखंडी चैनने जबर दुखापत करून त्यांच्याजवळील रोख अडीच हजाराचा ऐवज लुटला. ही घटना लहान पोटा रस्त्यावर ता. 9 मे ला घडली होती. उपचारानंतर रविवारी (ता. 12) रात्री सहा जणांवर हिमायनगर पोलिस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींपैकी दोघांना अटक केली आहे. 

पोलिस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, जुना कौठा (ता. नांदेड) येथील पंजाब विठ्ठल काळे (वय 45) हे आपल्या एका नातेवाईकांसोबत पारवा (ता. हिमायतनगर) येथून दुचाकीवरून पोटा या गावी जात होते. कुठल्यातरी जुन्या वादातून त्यांची दुचाकी लहान पोटा रस्त्यावर आरोपींतानी अडविली. तु कोठला आहेस, अमोल जाधव हा तुझ्याकडे कशाला आला होता असे म्हणून लोखंडी चैनने पंजाब काळे याच्या पोटावर जबर दुखापत केली. तसेच लाकडाने त्याला व त्याच्या नातेवाईकास बेदम मारहाण केली. लाथाबुक्यांनी जबर मारहाण करून ठार मारण्याची धमकी दिली. एवढेच नाही तर श्री. काळे हे जखमी होऊन खाली पडल्यानंतर त्यांच्या खिशातील रोख अडीच हजार रुपये जबरीने चोरून घेतले. जखमी अवस्थेत हे दोघेही हिमायतनगरच्या रुग्णालयात व त्यानंतर नांदेड येथे उपचारा घेऊन रविवारी हिमायनगर पोलिस ठाण्यात पोहचले. पंजाब काळे यांच्या फिर्यादीवरुन प्रदीप शंकरराव पतंगे, शंकर नारायणराव पतंगे, खंडेराव शंकरराव पतंगे, प्रमोद शंकरराव पतंगे, साहेबराव विठ्ठल पतंगे आणि त्यांचा एक साथिदार यांच्याविरूध्द दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक रविंद्र बोरसे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, या गुन्ह्यातील प्रदीप पतंगे व प्रमोद पतंगे यांना अटक केली असून सायंकाळी न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना पोलिस कोठडीत पाठविण्यात आले आहे. या प्रकरणाचा तपास स्वत: श्री. बोरसे हे करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com