औरंगाबादहून चोरलेली ट्रॅव्हल्स मालेगावात जप्त 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 जुलै 2018

नाशिक ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गुरुवारी (ता.12) रात्री नाशिक- धुळे महामार्गावर गस्त घालत होते. त्यावेळी वरीष्ठ पोलिस निरीक्षक अशोक करपे यांना औरंगाबाद शहरातून ट्रॅव्हल्स बस चोरून ती बस नांदगाव- मालेगाव मार्गे धुळ्याकडे जात असल्याची माहिती मिळाली.

नाशिक : औरंगाबादेतील सिडकोतील चोरी केलेली ट्रॅव्हल्स बस मालेगावमार्गे धुळ्याकडे जात असल्याची माहिती मिळताच नाशिक ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या गस्ती पथकाने पाठलाग करून चिखल ओहोळ (मालेगाव) शिवारात पकडली. यात कवडगाव (जि. औंरगाबाद) येथील संशयिताला अटक करण्यात आली आहे. 

नाशिक ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गुरुवारी (ता.12) रात्री नाशिक- धुळे महामार्गावर गस्त घालत होते. त्यावेळी वरीष्ठ पोलिस निरीक्षक अशोक करपे यांना औरंगाबाद शहरातून ट्रॅव्हल्स बस चोरून ती बस नांदगाव- मालेगाव मार्गे धुळ्याकडे जात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुंबई- आग्रा महामार्गावरील चाळीसगाव चौफुली येथे सापळा रचला. रात्रीच्या सुमारास औरंगाबादकडून धुळ्याच्या दिशेने येणारी पांढऱ्या रंगाची ट्रॅव्हल्स बसला (क्रमांक : एमएच 05-8573) पोलिसांनी थांबण्याचा इशारा केला असता चालकाने बस भरधाव वेगात पळविली. पथकाला संशय गेल्याने त्यांनी पाठलाग करत चिखल ओहोळ शिवारात बसला रोखले. संशयित चालक शेख अनिस शेख युसूफ (25, रा. कवडगाव, ता. पैठण, जि. औरंगाबाद) यास ताब्यात घेत चौकशी केली असता त्याने बस औरंगाबादच्या सिडकोतील एमजीएम हॉस्पिटल येथून चोरल्याची कबुली दिली. संशयितास औरंगाबादच्या सिडको पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कामगिरी निरीक्षक करपेश सहाय्यक निरीक्षक सदींप दुनगहू, सुनील अहिरे, वसंत महाले, राजू मोरे, सुहास छत्रे, राकेश उबाळे, फिरोज पठाण, रतिलाल वाघ व महामार्ग सुरक्षा पथकाने केली.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Stolen Travels from Aurangabad Seized in Malegaon