आमदार देशमुखांच्या घरावर दगडफेक 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 फेब्रुवारी 2017

माजलगाव - येथील आमदार आर. टी. देशमुख यांच्या घरावर गुरुवारी (ता. 23) रात्री उशिरा अज्ञात व्यक्तीने दगडफेक केल्याची घटना घडली. यात खिडकीच्या काचा फुटल्याचे शेजारच्या नागरिकांनी सांगितले. पंचायत समिती गणात झालेल्या पराभवामुळे पक्षातील कार्यकर्त्यांनीच हा प्रकार केल्याची चर्चा आहे. 

माजलगाव - येथील आमदार आर. टी. देशमुख यांच्या घरावर गुरुवारी (ता. 23) रात्री उशिरा अज्ञात व्यक्तीने दगडफेक केल्याची घटना घडली. यात खिडकीच्या काचा फुटल्याचे शेजारच्या नागरिकांनी सांगितले. पंचायत समिती गणात झालेल्या पराभवामुळे पक्षातील कार्यकर्त्यांनीच हा प्रकार केल्याची चर्चा आहे. 

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीचा गुरुवारी निकाल जाहीर झाला. यात भाजपला तालुक्‍यातील जिल्हा परिषदेची एकही जागा मिळाली नसून, पंचायत समितीच्या 12 पैकी केवळ तीन जागा मिळाल्या. यामुळे पराभव झालेल्या भाजप कार्यकर्त्यांत तीव्र असंतोष होता. गुरुवारी रात्री उशिरा आर. टी. देशमुख यांच्या बॅंक कॉलनी भागातील निवासस्थानी काही अज्ञात व्यक्ती गेल्या. तेथे गेल्यावर आमदार आहेत का, म्हणून विचारपूस केली; परंतु श्री. देशमुख हे घरी नव्हते. यामुळे चिडलेल्या व्यक्तीनी घरावर दगडफेक केली. यात खिडकीच्या काचा फुटल्याचे शेजारच्या नागरिकांनी सांगितले. याबाबत पोलिसांत कोणतीही तक्रार देण्यात आली नसली तरी शुक्रवारी (ता. 24) आमदार देशमुखांच्या घरासमोर एक पोलिस ठेवण्यात आला होता. दरम्यान तालुक्‍यातील पंचायत समितीच्या एका गणात देशमुखांनी एका कार्यकर्त्याला उमेदवारी दिली असता, नंतर ती काढून घेण्यास सांगितले; परंतु त्याने उमेदवारी मागे न घेता निवडणूक लढविली. त्या ठिकाणी भाजप सोबत युती केलेल्या जनविकास आघाडीचा उमेदवार ठेवण्यात आला होता. यामुळे सदर भाजप उमेदवाराचा पराभव झाल्याने त्या कार्यकर्त्याने हा प्रकार केल्याची चर्चा आहे. 

निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर दुपारीच परळीला गेलो होतो. यामुळे रात्री घरी कोणीच नव्हते. एखाद्या माथेफिरूने हा प्रकार केला असावा. निवडणुकीचा काही संबंध नाही. 
-आर. टी. देशमुख, आमदार 

Web Title: Stone Throw house of Deshmumkh